Solapur Crime News | खून प्रकरणातील महिला आरोपीला बार्शी विशेष सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

बार्शी/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Crime News | हुंड्याच्या कारणावरुन विवाहित महिलेचा छळ केला. तसेच तिचा पाण्याच्या हौदात बडवून खून केल्या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील (Solapur Crime News ) बार्शी शहर पोलीस ठाण्यात (Barshi City Police Station) आयपीसी 302, 304 (B), 201, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत महिलेच्या भावाने फिर्य़ाद दिली आहे. या गुन्ह्यातील महिला आरोपीला बार्शी विशेष सत्र न्यायालयाचे (Barshi Special Sessions Court) न्यायाधीश जयेंद्र जगदाळे (Judge Jayendra Jagdale) यांनी अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) मंजूर केल्याची माहिती अ‍ॅड. सुधीर पाटील (Adv. Sudhir Patil) यांनी दिली. हा प्रकार 3 मार्च 2022 रोजी घडला होता.

 

फिर्यादी यांच्या बहिणीचे पुण्यातील एका तरुणासोबत 29 जानेवारी 2022 रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर एक महिन्यातच विवाहितेच्या पतीने व त्याच्या नातेवाईकांनी हुंड्याच्या कारणावरुन तिचा छळ केला. यानंतर संबंधित महिला आणि पती हे बार्शी येथे राहणाऱ्या नणंदेच्या घरी गेले. त्याठिकाणी फिर्य़ादी यांच्या बहिणीचा पाण्याच्या हौदात बुडवून खून (Murder) केल्याची तक्रार मयत महिलेच्या भावाने बार्शी पोलीस ठाण्यात दिली. यावरुन पोलिसांनी पती व इतरांवर गुन्हा दाखल केला. (Solapur Crime News)

 

या गुन्ह्यातील महिला आरोपीने (पतीची बहिण) पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील वकील अ‍ॅड. सुधीर पाटील यांच्यामार्फत बार्शी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. अ‍ॅड. पाटील यांनी कोर्टात युक्तिवाद करताना सांगितले, मृत्युपूर्वी मयताचा छळ केल्याचा कोणताही पुरावा सरकारी पक्षाने न्यायालयात दाखल केलेला नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण दोषारोपपत्रात आरोपी यांचेविरुद्ध हुंड्याची मागणी केलेले स्पष्ट आरोप साक्षीदारांच्या जबाबात कोठेही नमूद नाही. आरोपी व मयत यांच्यामध्ये कुठलेही वैमनस्य नव्हते व तिला मारण्याचा कुठलाही हेतू आरोपींकडे नव्हता हे विविध उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करूनअ‍ॅड. सुधीर पाटील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

 

सरकारी वकिलांनी आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जास तीव्र विरोध करत कोर्टापुढे युक्तिवाद केला
की, आरोपीने हुंड्याच्या कारणावरून मयतास बेदम मारहाण करून पाण्याच्या हौदात बुडवून ठार केले आहे.
सदर प्रकरणात आरोपीचा करावयाचा तपास अद्याप पूर्ण झाला नसून आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावा.

 

बार्शी, विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयेंद्र जगदाळे यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून अ‍ॅड. सुधीर पाटील
यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी महिलेचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणात
अ‍ॅड. सुधीर पाटील यांना अ‍ॅड. विशाल आबासाहेब वीर-पाटील (Adv. Vishal Abasaheb Veer-Patil) यांनी सहकार्य केले.

 

Web Title :- Solapur Crime News | Barshi Special Sessions Court grants pre-arrest bail to female accused in murder case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Dutt Injured | शुटिंग दरम्यान जखमी झाल्याने संजय दत्त रूग्णालयात दाखल

Dr. Baba Adhav | डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण देण्याची शिवसेनेची (UBT) मागणी

Pune Crime News | अनैतिक संबंधाच्या संशयावरून प्रेयसी व तिच्या 2 लहान मुलांचा खून करणार्‍याला कोंढवा पोलिसांकडून अटक