Solapur Crime | अक्कलकोट-गाणगापूर रोडवरील भीषण अपघातात 5 जण ठार तर 2 गंभीर जखमी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Crime | अक्कलकोट-गाणगापूर रोडवर (Akkalkot-Gangapur Road) कर्नाटक हद्दीत (Karnataka Border) बळुरगी गावाजवळ भरधाव कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात (Accident) 5 जणांचा मृत्यू (Death) झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. भरधाव वेगात असणाऱ्या कारचा टायर फुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये 4 महिला व चालकाचा समावेश (Solapur Crime) आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.11) दुपारी तीनच्या सुमारास झाला.

 

हा अपघात एवढा भीषण होता की, पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अफझलपूर पोलीस स्टेशनमध्ये (Afzalpur Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. बाबासाहेब सखाराम वीर, कोमल बाबाबासाहेब वीर, राणी बाबासाहेब वीर, अणव हिराबाई, छाया बाबासाहेब वीर यांचा जागीच मृत्यू झाला. तर साहिल बाबासाहेब वीर, चैत्राली दिनकर सुर्यवंशी गंभीर जखमी झाले आहेत. (Solapur Crime)

 

अपघातात मृत्यू झालेले आणि जखमी हे सर्व अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील आहेत. हे सर्वजण गाणगापूरला दर्शनासाठी गेले होते. गाणगापूरहून परत अहमदनगरला जात असताना हा भीषण अपघात झाला. शिकाऊ चिन्ह असलेलं ‘L’ असं देखील गाडीच्या मागच्या काचेवर दिसत आहे. डॅटसन गो प्लस Datsun Go Plus (MH 16 BH 5392) या गाडीतून हे सर्व प्रवास करत होते. पुढील तपास अफझलपूर पोलीस करीत आहेत. (Solapur Accident)

 

Web Title :- Solapur Crime | solapur accident on akkalkot gangapur road 5 people death while 2 injured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Budget 2022 | काय सांगता ! होय, ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पाचं भाजपच्या ‘या’ आमदारानेच केलं कौतुक

 

Pune Crime | राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर आणि फसवणूक ! पुणे पोलिस दलातील गणेश जगतापसह 2 लिपिकांना अटक

 

MLA Sunil Tingre | खराडी-वडगावशेरी परिसरामध्ये साडेतीन एकर परिसरात ऑक्सीजन पार्क विकसित होणार – आमदार सुनील टिंगरे