Solapur News । ‘मी तालुक्याचा सभापती आहे, एक दोन मर्डर सहज खपवू शकतो म्हणत RTI कार्यकर्त्यावर केला गोळीबार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Solapur News | सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील बार्शी पंचायत समितीच्या सभापतीने एका आरटीआय कार्यकर्त्यावर गोळीबार (Firing) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ग्रामपंचायत आणि पंचायत समिती कारभाराची माहिती मागवल्याने गोळीबार (Firing) केल्याचा आरोप पंचायत समिती सभापती अनिल डिसले (Anil Disley) यांच्यावर करण्यात आला आहे. यानुसार डिसले यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल झाला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

अधिक माहितीप्रमाणे, हा प्रकार बार्शीतील वैरागमधील जोतिबाचीवाडी गावात घडला आहे. तर माहिती अधिकार कार्यकर्ता (RTI) प्रमोद ढेंगळेवर (Pramod Dhengale) गोळीबार केला. प्रमोद ढेंगळे हे (23 जून) रोजी जोतिबाचीवाडी बस स्थानकावरून आपल्या घरी रस्त्यावरुन निघाले होते. त्यावेळी रस्त्यामध्ये त्यांना सभापती अनिल डिसले यांनी हाक देऊन भेटण्यासाठी बोलावले. यांनतर अनिल डिसले (Anil Disley) यांनी प्रमोद ढेंगळे यांच्या डोक्यावर रिव्हॉलवर ठेवून अश्लिल शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी डिसले म्हणाले, ‘मी तालुक्याचा सभापती आहे, एक दोन मर्डर सहज खपवू शकतो, आमदार आमचाच आहे आणि पोलीस ठाणे त्यांच्या खिशात आहे. यापूर्वी माझ्याविरोधात ज्या तक्रारी दिल्या त्याचं पोलिसांनी काय केलं माहिती आहे, असं म्हणत डिसले यांनी प्रमोद यांना मारहाण केलीय.

या दरम्यान, RTI कार्यकर्ता प्रमोद ढेंगळे यांनी ग्रामपंचायत आणि पंचायत समिती कारभाराबाबत माहिती मागवली होती,
या विषयाच्या वादातून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तर या प्रकरणावरून प्रमोद ढेंगळे यांनी पोलीस आयुक्तालयामध्ये फिर्याद दिली आहे.
यावरून सभापती अनिल डिसले यांच्याविरोधात वैराग पोलीस ठाण्यात (Vairag Police Station) भा.द.वि. 307, शस्त्र कायदा 3 आणि 25 या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Solapur News । chairman of barshi panchayat samiti fires on an rti activist at solapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

WhatsApp | ‘या’ अकाऊंट्सवरून चॅट्दरम्यान दिसणार नाही ऑनलाइन स्टेटस, लास्ट सीन सुद्धा नसेल

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,727 नवीन रुग्ण, तर 10,812 जणांना डिस्चार्ज

Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी