दुर्दैवी ! Lockdown मुळे गावाकडे निघालेल्या चुलत भावांचा अपघाती मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइनः कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊन पडल्याने पुण्यात काही कंपन्यांनी कामगारांना सुट्टया दिल्या आहेत. कंपनी बंद, मेस बंद असल्याने लॉकडाऊन हटेपर्यंत आपल्या गावाकडे जावे असा विचार करून गावाकडे निघालेल्या केगाव बु. (ता. अक्कलकोट) येथील दोघा चुलत भावांचा शनिवारी (दि. 17) रात्री अपघाती मृत्यू झाला. या घटनेने दोन्ही कुटुंबार दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर चुलत भावंडांच्या मृत्यूने अख्य गावं शोक सागरात बुडाले आहे.

पंकज इरप्पा देसाई आणि राहुल सिध्दाराम देसाई (रा. केगाव बु. ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) अशी या चुलतभावांची नावे आहेत.

पंकज आणि राहुल पुण्यात कंपनीत कामाला होते. परंतू लॉकडाऊनमुळे कंपनीने सुट्ट्या दिल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊन हटेपर्यंत गावाकडे जावे असा विचार करून शनिवारी पंकज आणि राहुल दोघांनी गावाकडे निघाले. आपल्या गावाकडे आई-वडिलांच्या कुशीत विसावण्यासाठी येणाऱ्या या दोन मुलांवर रात्री काळाने घाला घातला. पंकज आणि राहुलचा अपघाती मृत्यू झाला. पंकज देसाई हा इरप्पा देसाईंचा मोठा मुलगा, मुलाच लग्न करावं म्हणून मोठ्या हौसेनी वडिलांनी गावात घर बांधले होते. दिवाळीत मुलाचे हात पिवळे करण्याच्या त्यांचा विचार होता. मात्र त्यापूर्वीच पंकजने या जगाचा निरोप घेतला. यापेक्षा मोठ दुर्दैव म्हणजे राहुल सिद्धाराम देसाई यांचा एकुलता एक मुलगा. यापूर्वीच पत्नी देवाघरी गेली होती. ज्याच्याकडे बघून आशेने जगाव तर तोच बापाचा हात अर्ध्यावर सोडून निघून गेला. पंकजच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ,एक बहीण असा परिवार आहे. तर राहुलच्या पश्चात फक्त त्याचा दुर्दैवी बाप आणि दोन बहिणी आहेत.