मुळव्याधची समस्या असेल तर ’हे’ पदार्थ खाणे टाळा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – मुळव्याध हा आजार नव्हे तर एक समस्या आहे, हे अगोदर आपण जाणले पाहिजे. तसेच ह्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपणाला काही पथ्य पाळणे आवश्यक आहे, असे डॉक्टर सांगत असतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण पथ्य पाळून त्यानुसार खाणे-पिणे केल्यास मुळव्याध कमी होण्यास मदत होईल.

मुळव्याधची समस्या महिलासह आणि पुरूषांमध्येही 20 ते 50 या वयोगटात उद्भवते. अशा स्थितीत तुम्ही आपल्या खाण्या-पिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अनियमीत आणि चुकीच्या अन्नपदार्थांचे तसेच मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे मुळव्याधाची समस्या उद्भवण्यास सुरूवा होत असते. व्यायाम न केल्यामुळे मुळव्याधाची समस्या सगळ्यात अधिक जाणवते.

शरीरात खालेल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर शिल्लक अन्न मलावाटे शरीराच्या बाहेर टाकले जातते. ही दररोजची ही क्रिया आहे. मात्र, जर तुम्हाला ही क्रिया करताना समस्यांचा सामना करावा लागत असेल तर ही क्रिया करत असताना खूप दुखण्याचा त्रास होत असतो.

मुळव्याधाच्या समस्यांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर काही बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. मुळव्याधाची समस्या उद्भवल्यानंतर तुम्हाला केवळ मल बाहेर टाकतानाच नाही तर बसताना आणि उठताना देखील खूप त्रास होतो. गुदभागी भेगा, चिरा पडतात. त्यामुळे कात्रीने कापल्याप्रमाणे तीव्र वेदना होतात. यामध्ये वेदना तर असतातच तसेच त्यासह आगही अधिक होत असते. मलासह रक्तही पडते. त्यामुळे मुळव्याधची समस्या सहजासहजी कोणाला सांगितली जात नाही. त्याकडे दुर्लंक्ष केले जाते. आणि हा त्रास सहन केला जातो. मात्र, याकडे दुर्लंक्ष केल्याने ही समस्या तीव्र रूप धारण करते. असे होऊ नये, यासाठी आहारातून काही पदार्थ वगळून तुम्ही या समस्येपासून सुटका घेऊ शकता.

लाल मिरची खाऊ नका
मुळव्याधचा त्रास असणार्‍यांनी लाल मिरची खाऊ नये. किंवा लाल मिरची खाणे टाळावे. त्यामुळे होणारी जळजळ कमी होईल. तसेच जेवण अधिक तिखट खाऊ नये. याचबरोबर, बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. कारण त्या पदार्थांध्ये मीठ, मसाल्यांचे प्रमाण अधिक असते. स्वच्छतेकडे दुर्लंक्ष केलेले असते. त्यामुळे आणखी समस्या वाढण्याची चिन्हे असतात.

आहारात अधिक प्रमाणात फायबर्सचा समावेश करा
मुळव्याधची समस्याचे निराकारण करण्यासाठी गरम पाणी, ताक प्या. तसेच ज्वारीची किंवा तांदळाच्या पिठाची भाकरी, मूग, मुगाची डाळ, जुना तांदूळ, सातू. उकडलेल्या पालेभाज्या, पपई, गोड द्राक्षं, सफरचंद, ताडफळ, काळ्या मनुका यांचा आहारात समावेश करावा. यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते आणि मुळव्याधचा त्रास हळूहळू कमी होतो. तसेच खाल्लेल्या अन्नाचे पचन अगदी व्यवस्थित होते.