खा.डॉ. सुजय विखेंनी संसदेत मांडले ‘हे’ ३ प्रश्‍न ; म्हणाले, शिर्डीचा तो प्रश्‍न प्राधान्यानं सोडवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खासदार सुजय विखे यांनी  शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न उपस्थित केला आहे. निर्मला सीतारामन यांच्या आभार व्यक्त करताना सुजय विखे यांना आपल्या मतदार संघातील प्रश्न देखील मांडले आहेत. यावेळी त्यांनी शिर्डी या तीर्थक्षेत्र असल्याचे सांगत त्यांनी शिर्डी ते पुणे हा ८ पदरी या महामार्गांचे काम जलद गतीने करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे संसदेत केली.

गडकरींचे मानले आभार –

सुजय विखे यांनी देशातील रस्तांच्या कामाबाबत नितीन गडकरी यांचे आभार मानले. यासह सुजय विखे यांनी मागणी केली की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ क्रमांक जो कल्याण ते आंध्र प्रदेश सीमा रेषेवरुन जातो. या महामार्गासाठी सुरु असलेल्या रस्ते हस्तांतरण प्रक्रिया वेगाने करावी, या महामार्गावर एक फ्लाय ओवर येतो, या फ्लायओव्हरमुळे त्या ठिकाणी ट्रॅफिक कमी होईल. त्यासाठी जमीन हस्तांतरण प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी अशी विनंती सुजय विखे यांनी केली. राष्ट्रीय महामार्गावरील बायपासचे काम धीम्या गतीने सुरु आहे. जमीन हस्तांतरण प्रक्रिया संथ गतीने होत असल्याने सुजय विखे यांनी संसदेत निदर्शनास आणून दिले.

पुणे – शिर्डी महामार्ग ८ पदरी करावा –

शिर्डी मतदार संघातील प्रश्न मांडताना ते म्हणाले की, शनिवार, रविवार शिर्डीला येऊन पहा. शिर्डीत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. शिर्डी संपूर्ण देशातील भाविक येतात. त्यात पुणे मार्गाने शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या आधिक असते. म्हणून पुणे ते शिर्डी हा ८ पदरी महामार्ग करावा. याबरोबरच भारतमाला- २ योजनेअंतर्गत पुणे ते औरंगाबाद या ८ पदरी महामार्गाचे कामही प्राधान्याने घ्यावे. अशी मागणी सुजय विखे यांनी संसदेत केली. सुजय विखे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात मतदार संघातील प्रश्न मांडून सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like