Sonalee Kulkarni | मॉडर्न लूकमध्ये सोनाली दिसते एकदम हॉट; फोटोने सोशल मीडियाचे वाढले तापमान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने मराठी सिनेसृष्टीत स्वतःची अशी एक वेगळी ओळख बनवली आहे. आज तिला अप्सरा म्हणून देखील ओळखले जाते. सोनालीचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. सोनालीने (Sonalee Kulkarni) नुकतेच तिच्या Instagram वर तिचे काही हटके फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

सोनाली सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे अनेक हटके फोटोज, व्हिडिओज चाहत्यांसाठी नेहमी शेअर करत असते. आज सोनालीने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी विश्वात त्याचबरोबर बॉलीवूडमध्ये देखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे. नटरंग ते तमाशा लाईव्ह इथपर्यंतचा सोनालीचा प्रवास हा खूपच अद्भुत होता. सोनालीने कधी मॉर्डन लुक मध्ये फोटो शेअर करून चाहत्यांना थक्क केले. तर कधी साडी नेसून सोज्वळ सौंदर्यही तिने चाहत्यांना दाखवले आहे.

सोनालीने तिच्या Instagram वर आता शेअर केलेल्या फोटोमध्ये ती शॉर्ट ड्रेस मध्ये दिसत आहे. या ड्रेस मध्ये ती खूपच बोल्ड आणि ब्युटीफूल दिसत आहे. सध्या तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट चा वर्षाव केला आहे. सोनाली (Sonalee Kulkarni) सध्या तिच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

 

Web Title :- Sonalee Kulkarni | sonalee kulkarni shared new photos in short dress take a look

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prisoners Release | प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील 189 कैद्यांना विशेष माफी, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

Michael Bracewell | ब्रेसवेलने केली धोनीच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील दुसरा खेळाडू

Maharashtra Politics | बहुमत राष्ट्रवादीला; सूत्रे मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हाती…