
Sonalee Kulkarni | नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने चाहत्यांना दिली ‘हि’ गोड बातमी; सर्वत्र होत आहे कौतुक
पोलीसनामा ऑनलाइन टीम : मराठी चित्रपट सृष्टीतील मनमोहक अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) तिच्या अभिनयाच्या जोरावर मराठीतच नाही तर बॉलीवूडमध्ये देखील स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोनालीने (Sonalee Kulkarni) तिच्या चाहत्यांसाठी गोड बातमी शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचे अभिनंदन देखील केले आहे.
सोनालीने आजवर विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. ज्या प्रेक्षकांच्या मनात भरल्या गेल्या आहेत.सोनालीने तिच्या कारकीर्दीची सुरुवात ‘खेळ संचिता’ या मालिकेद्वारे केले होते. त्यानंतर तिच्या प्रगतीचा आलेख हा उंचावतच गेला आणि तिने अल्पावधीतच नाव कमावले. आता तिने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. सोनाली लवकरच आता एका मल्याळम चित्रपटात दिसणार आहे.
सोनालीने नुकताच या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत याची माहिती चाहत्यांना दिली आहे. या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत सोनाली (Sonalee Kulkarni) म्हणाली की, “‘नवीन वर्ष… नवीन प्रवास…नवीन प्रदेश… @lijo_lebowski च्या #malayalam चित्रपट #malaikottaivaaliban मध्ये दिग्गज @mohanlal सर सोबत काम करताना माझे नवीन वर्ष खरोखरच आशादायक वाटत आहे”. सध्या सोनालीला तिच्या या नव्या धाटणीत पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तिचे सहकलाकार आणि अनेक चाहते अभिनंदन करत आहेत. सोनाली कुलकर्णी येणाऱ्या काळात ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या ऐतिहासिक चित्रपटातही झळकणार आहे.
Web Title :- Sonalee Kulkarni | sonalee kulkarni will see in malyalam cinema in this year shared movies poster
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime News | हात का लावला असे विचारताच महिलेला मारहाण, जीवे मारण्याचा प्रयत्न ! गणेशखिंड रोडवरील घटनेत तिघांना अटक
- Pune Crime News | फक्त 100 रूपयांसाठी त्यांनी मनगटापासून कापला पंकजचा ‘हात’
- Deepak Kesarkar | दीपक केसरकारांचे सूचक विधान, म्हणाले-‘उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केले तर शिवसेना पुन्हा…’