Sonam Kapoor | “त्याने माझ्या छातीला पकडलं आणि…”, सोनम कपूरने सांगितला आपल्याबाबत घडलेला धक्कादायक प्रसंग

पोलीसनामा ऑनलाईन : सोनम कपूर (Sonam Kapoor) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे.त्याचबरोबर सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता अनिल कपुर यांची मुलगी आहे . तिने ‘सावरीया’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र ‘नीरजा’ या चित्रपटामुळे तिला बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळाली. ती तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. (Sonam Kapoor)

2016 मध्ये सोनमने ‘अक्ट्रेस राऊंडटेबल’ या राजीव मसंद यांच्या शोला हजेरी लावली होती. या भागात सोनमसह आलिया भट्ट, राधिका आपटे, विद्या बालन व अनुष्का शर्माही सहभागी झाल्या होत्या. या मुलाखतीत सोनमने तिच्या बरोबर लैंगिक छळ झाल्याचं उघड केलं. 13 वर्षांची असताना सोनमबरोबर एका व्यक्तीने लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला होता. कपूर घराण्यात जन्मलेल्या सोनमलाही लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला होता. हे ऐकताच तिथे उपस्थित सगळेच अवाक झाले. पुढे सोनमने सांगितलं कि चित्रपटगृहात सिनेमा बघण्यासाठी गेलेले असताना माझ्यासोबत हा प्रसंग घडला होता. “चित्रपटगृहात असताना एका व्यक्तीने मागून येऊन माझ्या छातीला पकडलं. तेव्हा मी लहान होते अगदी 13 वर्षांचीच असेल, मी घाबरुन थरथरत होते. मी काय करू हे मला कळत नव्हतं. उभी राहून मी जोरजोरात रडायला लागले”, असा खुलासा तिने या शोमध्ये केला.

सोनम कपूर (Sonam Kapoor) व आनंद अहुजा यांनी 2018 मध्ये लग्न करून त्यांच्या नवीन
आयुष्याला सुरुवात केली होती. त्यानंतर 20 ऑगस्ट 2022 मध्ये त्यांना एक मुलगा झाला.
त्यांनी मुलाचं नाव वायू असं ठेवलं. प्रेग्नंन्सी दरम्यान केलेल्या फोटोशूटमुळेही सोनम बऱ्याचदा चर्चेत होती.
सोनम ‘वीरे दी वेडिंग’, ‘नीरजा’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘खूबसूरत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

Web Title :- Sonam Kapoor | when sonam kapoor talk about sexual harassment shared incidence

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra MLC Election Results | ‘सत्यजीत तांबे जिंकले तरीही तो भाजपचा विजय नसेल…;’ – जयंत पाटील

Pune Crime News | ‘आरोपी पकडा अन् बक्षीस मिळवा’, कोयता गँगच्या दहशतीमुळे पुणे पोलिसांची अनोखी योजना

Maharashtra MLC Election Results | सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार नाहीत…; मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले कारण