सलमानने सांगताच कियारा आडवाणीने बदलले आपले नाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची अभिनेत्री कियारा आडवाणी हिने कमी वेळात आपले नाव कमावले. चित्रपटसृष्टीत तिची वेगळी ओळख आहे. एका वृत्तसंस्थेने माहिती दिल्यानूसार कियारा ने सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान ने सांगितल्यामुळे आपले नाव बदलले आहे.

एका शो मध्ये कियाराने सांगितले की, ‘पहिल्यांदा माझे नाव आलिया होते. सलमान खानने आलिया भट्ट च्या नावामुळे माझे नाव बदलण्याचा सल्ला दिला. कारण, बॉलिवूडमध्ये एकाच नावाच्या दोन अभिनेत्री असू शकत नाही, असे सलमानचे म्हणणे होते. सलमानने केवळ सल्ला दिला आणि मी लगेच माझे नाव कियारा केले. मी माझ्या नावाची निवड स्वतः केली होती. आता घरात सगळे मला कियारा नावाने आवाज देतात. फार कमी लोकांना माहित आहे की कियाराचे नाव आलिया होते.

कियाराने २०१४ मध्ये ‘फगली’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. कियाराने ‘फगली’ चित्रपटानंतर आपले नाव बदलले होते. आलियाचे कियारा असे केले होते. फगलीच्या एका गाण्यात सलमानने अक्षयसोबत एक स्पेशल अपीयरन्स दिला होता. या चित्रपटात दिमी शेरगिल, मोहित माहवाह, विजेंदर सिंह, आणि आर्फी लांबाने देखील महत्वपुर्ण भूमिका साकारल्या होत्या. त्याचबरोबर कियाराने ‘एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ आणि ‘मशीन’ चित्रपटात देखील काम केले आहे.

कियाराला अनेक चित्रपट केल्यानंतर ‘इमर्जिंग स्टार ऑफ द इअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिने हिदी सह तेलगू चित्रपटात देखील काम केले आहे. ती सध्या शाहिद कपूरसोबत ‘कबीर सिंह’ चित्रपटात काम करणार आहे. हा चित्रपट जूनमध्ये रिलीज होणार आहे.