‘ब्रह्मास्त्र’मधील गाण्याच्या शुटींगचा व्हिडीओ ‘लीक’, जबरदस्त डान्स करताना दिसले ‘रणबीर-आलिया’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आलिया भट आणि रणबीर कपूर सध्या आगामी सिनेमा ब्रह्मास्त्रच्या शुटींगमध्ये व्यस्त आहेत. अलीकडेच दोघे एका गाण्याच्या शुटींगसाठी वाराणसीला गेले होते. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लीक झाल्याचं दिसत आहे. रणबीर आणि आलियाचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. एका गाण्याच्या शुटींगचा हा व्हिडीओ आहे. रणबीर-आलिया या व्हिडिओत डान्स करताना दिसत आहेत.

लुकबद्दल बोलायचं झालं आलियानं जिन्स, टीशर्ट आणि लाँग श्रग घातला आहे तर रणबीरनं जीन्स टीशर्ट आणि जॅकेट घातलं आहे. आलियाच्या पाठीवर बॅगही दिसत आहे. दोघांचा लुक एकदम कुल दिसत आहे. शुटींगचा व्हिडीओ लीक झाल्यानं दोघंही चर्चेत आले आहेत.

https://www.instagram.com/p/B6Deq0VBgXu/?utm_source=ig_embed

ब्रह्मास्त्र सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर रणबीर आणि आलिया या सिनेमाच्या निमित्तानं पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. धर्मा प्रॉडक्शनचा हा सिनेमा एक बिग बजेट सिनेमा आहे. हा सिनेमा तीन पार्टमध्ये रिलीज केला जाणार आहे. अयान मुखर्जी सिनेमा डायरेक्ट करत आहे. सिनेमातील काही भाग इज्रायलच्या तेल अवीवमध्ये तसेच बुल्गेरिया या ठिकाणीही काही भाग शुट करण्यात आला आहे.