Sonia Gandhi – Smriti Irani | ‘Don’t Talk to me’ संसदेत स्मृती इराणी आणि सोनिया गांधींमध्ये शाब्दीक चकमक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sonia Gandhi – Smriti Irani | संसदेमध्ये खासदारांमध्ये होणारी ‘तू तू मैं मैं’ देशाला नवीन नाही. भांडणाच्या घटना वारंवार आपल्याला पाहायला मिळतात. अशीच काहीशी घटना गुरूवारी संसदेत (Parliament) घडली. काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी (Congress MP Adhir Ranjan Chaudhary) यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांचे नाव घेताना त्यांच्या पदाचा ‘राष्ट्रपत्नी’ असा उल्लेख केला होता. त्यावरून एकच गोंधळ सुरू झाला. या प्रकरणावरूनच भारतीय जनता पार्टीने (BJP) काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यातच स्मृती इराणी (Smriti Irani) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यामध्ये देखील शाब्दीक चकमक पाहायला मिळाली. सोनिया गांधी यांनी स्मृती इराणींना ‘Don’t Talk to me’ म्हंटल्याने वातावरण अधिकच तापले.

 

चौधरी यांच्या वक्तव्यावरून लोकसभा (Lok Sabha) व राज्यसभेमध्ये चांगलाच गदारोळ झाला.
नंतर त्यांनी याबाबत माफी देखील मागितली परंतू भाजपाचे खासदार सोनिया गांधी यांच्या राजीनाम्याची घोषणा देत होते.
सोनिया यांनी भाजपाच्या खासदार रमा देवी (MP Rama Devi) यांना सांगितले की, चौधरी यांनी माफी मागितली आहे.
त्याचवेळी स्मृती इराणी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु आधीच संतापलेल्या सोनिया यांनी त्यांना जोरात ‘Don’t Talk to me’ म्हणजे माझ्याशी बोलू नका असे सांगितले.
यावरून इराणी देखील भडकल्या आणि दोघींमध्ये जवळजवळ दोन मिनिटे वादावादी झाली.
यावेळी दोन्ही पक्षांचे खासदार आले आणि दोघींना शांत केले. (Sonia Gandhi – Smriti Irani)

काँग्रेसच्या खासदार गीता कोडा (MP Geeta Koda) यांनी सांगितले की, आम्ही सर्वजण सभागृहाबाहेर (Parliament)
जात असताना भाजपाचे खासदार जोरजोरात घोषणाबाजी करत होते. ओरडत होते.
सगळेजण सोनिया गांधी यांचे नाव घेत होते. सोनिया गांधी सगळे समजून घेण्यासाठी म्हणून रमा देवी यांच्याकडे गेल्या.
तेव्हा देखील भाजपाचे खासदार जोरजोरात ओरडत होते.
स्मृती इराणी देखील त्यांच्यात होत्या. नंतर सोनिया यांना आम्ही बाहेर घेऊन आलो.

 

काँग्रेसचे नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी म्हंटले आहे की, सोनियांबरोबर जे काही वर्तन झाले ते असभ्य आणि अपमानास्पद होते. स्पीकर याचा निषेध करणार का ?

 

Web Title : –  Sonia Gandhi – Smriti Irani | sonia gandhi and smriti irani heated exchange of words over adhir ranjan

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा