‘सूर्यवंशी’च्या सेटवरील ‘खिलाडी’ ‘अक्षय-कॅटरीना’चा व्हिडीओ व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि कॅटरीना कैफ सूर्यवंशी या आगामी सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहेत. या सिनेमात अक्षय कुमार ATS चीफच्या भूमिकेत दिसणार आहे. कॅट फीमेल लिड रोल करणार आहे. नुकताच सिनेमाच्या शुटींगदरम्यानचा अक्षय आणि कॅटचा बाईक राईड करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, अक्षय आणि कॅटरीना स्पोर्ट बाईक चालवत आहे. असं म्हटलं जात आहे की, कॅटचा हा सिक्वेंस सिनेमातील गाणं ना जा मध्ये दाखवला जाणार आहे. रोहित शेट्टीनं मेकिंगदरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशलवरून शेअर केले आहेत.

https://twitter.com/AkkiDhoni_/status/1227084787724079104

रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये आतापर्यंत सिंघम, सिंघम रिटर्न्स, आणि सिंबा अशा सिनेमांचा समावेश आहे. यातील आता चौथा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमार आणि कॅटरीना कैफ स्टारर सूर्यवंशी सिनेमात जबरदस्त अ‍ॅक्शन पहायला मिळणार आहे असं दिसत आहे. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सच्या सिनेमांनी आतापर्यंत बक्कळ कमाई केली आहे.

सूर्यवंशीमध्ये खास काय ?

सिंबा सिनेमातच सूर्यवंशी सिनेमाची झलक पहायला मिळाली होती. सिंबामध्ये रणवीर सिंग लिड रोलमध्ये होता तर अजय देवगणचा गेस्ट अपीरंस होता. सूर्यवंशीमध्ये अक्षय कुमार लिड रोलमध्ये आहे आणि असं म्हटलं जात आहे की, यात अजय देवगण आणि रणवीर सिंग यांचा गेस्ट अपीरंस असणार आहे. काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीनं शेअर केलेल्या एका व्हिडीओत याची झलक पहायला मिळाली होती.