सोलापूरच्या ZP शाळेतील शिक्षक, विद्यार्थी साकारताहेत ‘ग्रीन प्लॅनेट’ प्रोजेक्ट

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सोलापूर जिल्हा परिषदेमधील शिक्षकांनी एक अतिशय स्तुत्य आणि प्रेरणात्मक उपक्रम हाती घेतला असून ग्रीन प्लॅनेट हा प्रोजेक्ट त्यांनी सुरु केला असून यामध्ये 11 देशांमधील जवळपास 100 शाळांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. या प्रोजेक्टमध्ये अनेक उपक्रम राबवण्यात येत असून यामध्ये वृक्ष लागवडीकरीता एन्व्हायरमेंटल रिपोर्ट कार्ड तयार करणे तसेच संपूर्ण गावाचा ग्रीन मॅप तयार करणे त्याचबरोबर झाडांचे वयोमान काढणासारख्या प्रयोगांचा समावेश आहे.

रणजितसिंह डिसले असे या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचे नाव असून एकूण 6 आठवड्यांचा प्रोजेक्ट असून 15 ऑगस्ट पासून याला सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला सर्व आकडेवारी गोळा करून विद्यार्थ्यांना याची माहिती दिली जाणार आहे.

या आकडेवारीमध्ये गावची लोकसंख्या किती आहे ? आपल्या गावात एकूण किती झाडे आहेत ? विहीर, कालवा, शेततळे, बोअर, नदी, तलाव, यांची संख्या किती ? गावात एकूण एसी, एलपीजी कनेक्शन, मोबाईल, टीव्ही, दुचाकी, चारचाकी, चुलीवर स्वयंपाक करणारे कुटुंब संख्या किती ? गावचे एकूण क्षेत्रफळ किती ? गावात पाण्याचे स्रोत कोणकोणते आहेत ? अशा प्रकारची माहिती विद्यार्थ्यांनी गोळा केली आहे.

त्यानंतर गावाचा ग्रीन मॅप तयार केला जाणार असून याआधारे गावातील प्रत्येक गोष्टीचे सर्व्हेक्षण करून सर्व मुद्दे मांडले जाणार आहेत. त्यानंतर या सर्व गोष्टींचा एक आराखडा मांडला जाणार असून तो गावातील सरपंचांना सादर केला जाणार आहे.

या प्रोजेक्टमध्ये सहभागी देश
भारत
इस्त्राईल
अमेरिका
कमेरून
जॉर्जिया
व्हिएतनाम
अझरबैजान
बांग्लादेश
ब्राझील
ग्रीस
नायजेरिया
युक्रेन

महाराष्ट्रातील सहभागी जिल्हे
सोलापूर, ठाणे,यवतमाळ,बुलढाणा, रायगड,बीड,नांदेड,नाशिक,पुणे, लातूर, जालना, नागपूर, अमरावती, जळगाव, वर्धा, परभणी, उस्मानाबाद, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये हा प्रोजेक्ट सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त