कौतुकास्पद ! अपंगत्वावर मात करून ‘ती’ झाली IAS, देशात मिळवलं नववं ‘रँकिंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जिद्द आणि चिकाटी मनात असेल तर आपण कितीही मोठे आव्हान पेलू शकतो याचे योग्य उदाहरण म्हणजे दिल्लीमध्ये राहणाऱ्या सौम्या शर्मा आहेत. सौम्या शर्माने 16 व्या वर्षीच ऐकू येण्याची क्षमता गमावली. ऐकण्यासाठी तिला श्रवणयंत्राची मदत घ्यावी लागते. पण यामुळे खचून न जाता तिने जिद्द आणि चिकाटीने IAS चा अभ्यास करायचं ठरवलं. अवघ्या 23 व्या वर्षी तिने अभ्यास सुरू केला आणि कोणत्याही कोचिंगशिवाय परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊन दाखवले.

सौम्या सांगते, माझ्यासाठी यूपीएससीची परीक्षा देणं हे इतर कोणतीही परीक्षा देण्यासारखंच होतं. अभ्यासाचं नीट प्लॅनिंग केलं आणि ते काटेकोरपणे अमलात आणलं तर ही परीक्षाही सोपी होते. सौम्याने दिल्लीच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतून LLB पूर्ण केलं. 2017 मध्ये तिने यूपीएससीची तयारी सुरू केली. त्याच वर्षी तिने प्रिलिम्स आणि मेन्सची परीक्षा दिली.

सौम्या कर्णबधिर असल्यामुळे तिचा समावेश अपंगांसाठीच्या श्रेणीत केला गेला. पण तिने याला नकार दिला आणि नॉर्मल विद्यार्थ्यांसाठी असलेल्या श्रेणीतच यूपीएससीचा फॉर्म भरला.

परीक्षेच्या वेळी खूप जास्त प्रमाणात ताप असूनही सौम्याने घरच्यांच्या मदतीने परीक्षेला सामोरे जाण्याचे ठरवले आणि तशी तयारी करून परीक्षेसाठी उतरली आणि घवघवीत यशही तीने मिळवून दाखवलं. सौम्याचा हा प्रवास इतर सर्वच IAS होऊ पाहणाऱ्या मुलांसाठी प्रेरणादायी आहे.

आरोग्यविषयक वृत्त –