Sourav Ganguly Statement | सचिन-विराटच्या तुलनेवरील वादावर गांगुलीचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन : Sourav Ganguly Statement | सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून दुसरा सामना आज खेळवण्यात येत आहे. पहिल्या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले होते. यावेळी क्रीडाप्रेमींनी विराट आणि सचिन तेंडुलकर यांची तुलना करायला सुरुवात केली. या तुलनेवर आता भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याने मोठे वक्तव्य केले आहे. (Sourav Ganguly Statement)
सौरभ गांगुली म्हणाले विराट विरुद्ध सचिन वादावर उत्तर देणे खूप कठीण आहे. विराट कोहली महान खेळाडू आहे.
त्याने अश्या काही खेळी खेळल्या आहेत. या खेळीमुळे त्याने भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. 45 शतके अशीच होत नाहीत. ती एक विशेष प्रतिभा आहे.” असे गांगुली म्हणाले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यांमध्ये 49 शतके झळकावली आहेत तर विराटने 45 शतक केले आहेत. त्यामुळे विराटने अजून 5 शतक केले तर तो सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड लवकरच मोडू शकतो. (Sourav Ganguly Statement)
भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 7 विकेट गमावून 373 धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाने 50 षटकांत 8 गडी गमावून 306 धावा केल्या.
यामुळे भारताने पहिला सामना 67 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती.
या सामन्यात विराटने शतक तर शुभमन गिल आणि रोहितने अर्धशतके झळकावली होती.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना आज कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जात आहे.
Web Title :- Sourav Ganguly Statement | sourav gangulys big statement on the comparison between virat kohli and sachin tendulkar said kohli is a special player
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Tejas Thackeray | पोस्टरबाजीमुळे पुन्हा एकदा तेजस ठाकरे राजकीय मैदानात उतरण्याच्या चर्चांना उधान