Video : आता तैवाननं दिली चीनला धमकी ! हत्यार आणि लढावू विमानांचा व्हिडीओ शेअर करत लिहीलं – ‘ठासून उत्तर मिळेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तैवान आणि चीन यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. आता तैवानने चीनला धमकी दिली आहे. तेथील संरक्षणमंत्र्यांनी एक व्हिडिओ शेअर करत चीनला म्हटले आहे की, ते लढाईसाठी भडकावणार नाहीत, परंतु चीनने पुढे येऊन काही केले तर त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. दोन दिवसांपूर्वी अमेरिका आणि तैवान यांच्यात एफ-१६व्ही लढाऊ विमान करारावरून चीनने तैवानला नष्ट करण्याची धमकी दिली होती.

व्हिडिओ शेअर करत दिली धमकी
तैवानच्या संरक्षणमंत्र्यांनी गुरुवारी उशिरा एक व्हिडिओ शेअर केला. तैवान आर्मी सैनिकी कवायती करत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहता येईल. १ मिनिट १८ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये बरीच शस्त्रे, क्षेपणास्त्रे, रॉकेट आणि लढाऊ विमान दिसत आहेत. व्हिडिओसह मंत्र्यांनी लिहिले आहे की, तैवानला कमजोर मानले जाऊ नये आणि शत्रूंना चोख प्रत्युत्तर मिळेल.

या करारावरून गोंधळला चीन
तैवान आणि अमेरिका यांच्यात ६२ अब्ज डॉलर्सचे एफ-१६ लढाऊ विमान खरेदी करण्याचा करार झाला आहे. या कराराअंतर्गत तैवान सुरुवातीला ९० लढाऊ विमानांची खरेदी करेल, जे अत्याधुनिक तंत्रज्ञान व शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. हा करार सुमारे १० वर्षात पूर्ण होईल, परंतु काही विमान त्यांना आत्ता मिळतील. चीनच्या सरकारी माध्यमांनी इशारा दिला आहे की, जर तैवानने हा करार मागे घेतला नाही तर पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) सैन्य कारवाईसाठीही पूर्णपणे तयार आहे. चीनने उघडपणे धमकी दिली आहे की, त्यांचे लढाऊ विमान तैवानचे हवाई क्षेत्र नष्ट करेल.

चीन-तैवानचे संबंध
चीनने तैवानला नेहमीपासून वेगळे केलेले प्रांत म्हणून पाहिले आहे. भविष्यात तैवान चीनचा भाग होईल असा चीनचा विश्वास आहे. तर तैवान मोठी लोकसंख्या म्हणून स्वतःला एक स्वतंत्र देश म्हणून पाहू इच्छित आहे. या कारणामुळेच दोघांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अलीकडेच या बेटावर चीनने आर्थिक, सैन्य आणि मुत्सद्दी दबाव देखील वाढवला आहे. चीनचा असा विश्वास आहे की, तैवान हा त्यांचा प्रदेश आहे. गरज पडल्यास ते शक्तीच्या जोरावर ताब्यात घेतले जाऊ शकते, असे चीनचे म्हणणे आहे.