Sovereign Gold Bond | सरकारकडून स्वस्त सोने खरेदी करण्याची शेवटची संधी, आज गमावल्यास होईल मोठे नुकसान

नवी दिल्ली : जर तुम्हालाही सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही सरकारच्या सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) योजनेअंतर्गत सोन्यात गुंतवणूक करू शकता. यात गुंतवणूक केल्याने बाजारातील दरापेक्षा स्वस्त सोने मिळते. सॉव्हरेन गोल्ड बाँड्स २०२२-२३ च्या तिसऱ्या मालिकेत गुंतवणूक करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. १९ डिसेंबर २०२२ रोजी हे बाँड सबस्क्रिप्शनसाठी खुले झाले आहेत. सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) सरकारच्या वतीने आरबीआय जारी करते. सॉव्हरेन गोल्ड बाँड २०२२-२३ च्या तिसऱ्या मालिकेसाठी इश्यू प्राईज रुपये ५,४०९ प्रति ग्रॅम आहे.

ऑनलाइन अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम ५० रुपये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी त्यांना डिजिटल माध्यमातून पैसे भरावे लागतील. याचा अर्थ ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाँड्सची इश्यू प्राईज ५,३५९ रुपये प्रति ग्रॅम असेल.

सॉव्हरेन गोल्ड बाँड कोठे खरेदी करायचे?
सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) शेड्यूल्ड कमर्शियल बँका (स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका वगळून), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, डेजिग्नेटेड पोस्ट ऑफिसेस, एनएसई आणि बीएसईद्वारे विकले जातात.

Sovereign Gold Bond सॉव्हरेन गोल्ड बाँडवर २.५० टक्के व्याज
सॉव्हरेन गोल्ड बाँडचा मॅच्युरिटी पिरियड ८ वर्षांचा आहे.
सोबतच, यात तुम्हाला ५ व्या वर्षानंतर पुढील व्याज मिळण्याच्या तारखेला बाहेर पडण्याचा पर्याय देखील आहे.
गुंतवणूकदारांना अर्धवार्षिक आधारावर दर्शनी मूल्यावर सहामाही आधारावर २.५० टक्के वार्षिक व्याज मिळेल.

कमाल ४ किलोच्या मुल्यापर्यंत रोख खरेदी मर्यादा
सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेत, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ४ किलो सोन्याच्या
मुल्याचे सॉव्हरेन बाँड खरेदी करू शकते. तसेच, किमान एक ग्रॅम गुंतवणूक आवश्यक आहे.
ट्रस्ट किंवा त्यासारख्या संस्था २० किलोपर्यंतचे बाँड खरेदी करू शकतात.
अर्ज किमान १ ग्रॅम आणि त्याच्या पटीत जारी केले जातात.

Web Title :- Sovereign Gold Bond | sovereign gold bonds latest news last day to buy gold at discount details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा