सभापती सत्‍ताधार्‍यांच्या हातातील ‘खेळणं’ बनल्याची चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा असो अथवा लोकसभा तेथे निवडून आलेला आमदार अथवा खासदार हा सभागृहाचा सभापती झाला की, तो पक्षाचा रहात नाही. त्याने कायद्याचा विचार करुन स्वतंत्रपणे निर्णय घेणे अपेक्षित असते. पण सध्या लोकसभाच नाही तर अनेक विधानसभेचे सभापती हे सत्ताधारी भाजपाच्या हातातील खेळणे बनले आहेत. या सभापतींना भाजपा ना सन्मानाची वागणूक देते, ना हे सभापती आपल्या पदाची शोभा वाढेल असे काम करतात. सत्ताधाऱ्यांचे शब्द झेलण्यासाठी हे सभापती आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दिसून येत आहे. यापूर्वी कधीही अगदी इंदिरा गांधी यांना हुकुमशहा म्हटले जात असले तरी त्यांनी सभापतीसारख्या सार्वभौम अधिकार असलेल्या पदावरील व्यक्तीची अशी अवहेलना केली नव्हती.

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे सध्याच्या लोकसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यामुळेच त्यांना सभापती करण्यात आले. आजवरचे त्यांचे काम चांगले चालले आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांचा शनिवारी सकाळी भाजपा प्रवेश निश्चित झाला. त्याअगोदर त्यांचा खासदारकीचा राजीनामा मंजूर होणे आवश्यक होते. कोणतीही आणीबाणीची परिस्थिती नसताना सभापती ओम बिर्ला यांना उदयनराजे यांचा राजीनामा स्वीकारण्याचा आदेश मध्यरात्री देण्यात आला. तेव्हा त्यांनी पहाटे सव्वातीन वाजता हा राजीनामा स्वीकारुन मंजूर केला. त्यानंतर राजेंचा भाजपा प्रवेश सुकर झाला.

असेच चित्र महाराष्ट्रात शुक्रवारी दिसून आले. कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार भास्कर जाधव यांचा शिवसेना प्रवेश व्हायचा होता. त्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरु होती. पण शुक्रवारी तातडीने तो करण्याचा आदेश निघाला. पण त्याअगोदर त्यांचा आमदारकीचा राजीनामा मंजूर होणे आवश्यक होते. मग काय आदेश निघाला. तातडीने रायगडहून खासगी विमान औरंगाबादसाठी उडाले. इकडे सभापती हरीभाऊ बागडे हे आपल्या मतदारसंघात कार्यक्रमात गुंतलेले, त्यांना तातडीने औरंगाबादला येण्याचा आदेश दिला गेला. ते शासकीय गाडीने औरंगाबादला येऊ लागले. वाटेत रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे येणार असल्याने गाड्या थांबविल्या गेल्या होत्या. आता त्यासाठी काही मिनिटे जाणार हे नक्की होते, पण ऐवढ्याने उशीर झाला तर काय, पक्षश्रेष्ठी काय म्हणतील, याचा विचार करुन रेल्वे जाण्याची वाट न पाहता बागडे यांनी चालत रेल्वे रुळ ओलांडले. दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या एका मोटारसायकलवाल्याच्या मागे बसून ते ठरलेल्या ठिकाणी एका खासगी इमारतीत पोहचले. त्यांनी भास्कर जाधव यांचा राजीनामा स्वीकारला. व तो तातडीने मंजूर केला.

असेच काहीसे उदाहरण गोव्यात दिसून आले होते. तेथे तर राज्यपालांनाच सत्ताधाऱ्यांनी हातचे खेळणे बनविले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले. त्यामुळे गोव्यात भाजपाला पाठिंबा देणारे पक्ष दोलायमान दिसू लागले. त्यामुळे पर्रीकर यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याच रात्री विधानसभेचे सभापती यांना राजीनामा देण्यास लावून त्यांना मध्यरात्री मुख्यमंत्र्यांची शपथ देण्यास राज्यपालांना सांगितले होते. राज्यपालांनीही सत्ताधाऱ्यांचा हा आदेश शिरसावंद्य मानत मध्यरात्री शपथ दिली. त्यानंतर काही दिवसांनी मगोपा पक्षात फुट पाडून त्यांनी काही जणांना अशाच प्रकारे मध्यरात्री याच राज्यपालांनी मंत्रीपदाची शपथ देताना सत्ताधाऱ्यांचे आदेश पाळताना काही संकेत धाब्यावर बसवत असल्याकडे दुर्लक्ष केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

You might also like