Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरसचं आणखी एक खतरनाक ‘लक्षण’ आलं समोर, WHO नं दिला ‘इशारा’

जिनिव्हा : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या 43 लाखांच्या पुढे गेली आहे. तर मृतांचा आकडा 3 लाखाच्या वर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जगाला कोरोना विषाणूच्या नवीन लक्षणांबद्दल इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी सांगितले की, बोलण्यात येत असलेली अडचण म्हणजे करोनाचे एक गंभीर लक्षण आहे. आतापर्यंत जगभरातील डॉक्टर केवळ खोकला किंवा ताप ही कोरोनाची मुख्य लक्षणं असल्याचे सांगत होते. मात्र, आता नव्या लक्षणामुळे आणखी चिंता वाढली आहे.

कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांचा दावा आहे की, इतर लक्षणांसह त्यांना बोलण्यात अडचण येणे ही कोरोना विषाणूची लागण होण्याचे एक संभाव्य लक्षण आहे. एखाद्या व्यक्तीला बोलण्यात तसेच चालण्यात त्रास होत असेल तर त्याने त्वरीत डॉक्टरांना भेटावे असे जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी सांगितले आहे.

जागतिक आरोग्या संघटनेनं म्हटल आहे की, कोरोना व्हायरसमुळे संक्रमित झालेल्या लोकांना श्वसोच्छवासाची हलकी समस्या असू शकते आणि विशिष्ट उपचारांशिवाय ते बरे होतील. कोरोना व्हायरसच्या गंभीर लक्षणामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे आणि छातीत दुखणे, बोलणे किंवा चालण्यात अडचण येणे ही देखील विषाणूची गंभीर लक्षणे समाविष्ट आहेत. त्यामुळे जर एखाद्याला अशी गंभीर समस्या येत असेल तर त्याने ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. तसेच डॉक्टरांकड जाण्यापूर्वी एकदा हेल्पलाईनचा सल्ला घ्यावा.

बोलण्यात अडचण नेहमीच कोरोना व्हायरसचे लक्षण नसते. कधीकधी इतर कारणांमुळे बोलण्यास त्रास होतो. या आठवड्यात झालेल्या आणखी एका संशोधनात असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसचे आणखी एक लक्षण म्हणजे सायकोसिस (मनोविकृती) देखील आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

मेलबर्नमधील ला ट्रॉब युनिव्हर्सिटीने असा इशारा दिला आहे की, कोरोना विषाणूमुळे बऱ्याच रुग्णांना मानसिक आजाराचा त्रास सहन करावा लागत आहे, कोरोना विषाणू प्रत्येकासाठी एक अत्यंत तणावपूर्ण अनुभव आहे. हे आयसोलेशन दरम्यान वाढत आहे. अभ्यास पथकाने मार्स व सार्ससारख्या इतर विषाणूंविषयी देखील अभ्यास केला आहे. आणि ते मनुष्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम करीत आहेत की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे डॉ. एली ब्राऊन यांनी सांगितले.