‘हा’ प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर झळणकार ‘मराठी’ चित्रपटात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतासाठी अनेक क्रिकेट मॅचेस खेळलेल्या मात्र आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामध्ये अडकलेल्या श्रीसंतवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर त्यांने अभिनयक्षेत्रात जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीसंतने काही हिंदी आणि दक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. अक्सर 2 आणि कॅबरेट या हिंदी तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तो झळकला होता.

चित्रपटांशिवाय त्याने एक खिलाडी एक हसीना या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुरवीन चावलासोबत भाग घेतला होता. तसेच झलक दिखला जा या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये त्याच्या डान्स त्याच्या फॅन्सला पहायला मिळाला होता. बिग बॉस, फिअर फॅक्टर यासारख्या प्रसिद्ध कार्यक्रमात देखील तो स्पर्धकाच्या भूमिकेत दिसला होता. हिंदी आणि दक्षिणात्य चित्रपटानंतर श्रीसंत याने आपला मोर्चा मराठी चित्रपटाकडे वळवला आहे. त्याने एक मराठी चित्रपट साईन केला असून त्याचे चित्रिकरण लवकरच सुरु होणार आहे.

श्रीसंत करत असलेल्या मराठी चित्रपटाचे नाव ‘मुंबईचा वडापाव’ असे असून या चित्रपटाची निर्मिती पीके अशोकन आणि मेहराली पोईलंगल इस्माइल करत आहेत. या चित्रपटात मल्याळम आणि मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार दिसणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटातील श्रीसंतची व्यक्तिरेखा त्याने आजवर केलेल्या भूमिकेपेक्षा वेगळी असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिल महिन्यात सुरु होणार असून पुणे आणि नाशिकमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा निर्मात्यांकडून लवकरच होणार आहे.

You might also like