डोक्याला चेंडू लागल्याने फलंदाज मैदानातच कोसळला

कॅनबेरा : वृत्तसंस्था – श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या दुसरा क्रिकेट कसोटी सामना सुरु आहे. सामन्यात श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथ करुणारत्नेचा अपघात झाला आहे. या सामन्यादरम्यान श्रीलंकेच्या करुणारत्नेला डोक्यात चेंडू लागल्यामुळे तो जखमी होऊन मैदानावर कोसळला. या चेंडूचा वेग ताशी १४२.५ किमी होता. त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पॅट कमिन्सने टाकलेल्या एका चेंडूचा सामना करताना करुणारत्नेचा हा अपघात घडला. यानंतर करुणारत्नेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पॅट कमिन्सने टाकलेला चेंडू करुणारत्नेच्या हेल्मेटच्या खाली लागताच तो मैदानावर कोसळला.

https://twitter.com/183_264/status/1091580599754784768

फिलिप ह्युजेसचा चेंडू लागल्यानेच झाला होता मृत्यू

दरम्यान यापूर्वी, ऑस्‍ट्रेलियाचा सलामीवीर फिलिप ह्युजेसचा २०१४ ला डोक्याला चेंडू लागल्याने क्रिकेटच्या मैदानावरच दुर्देवी अंत झाला होता. शेफिल्ट शिल्ड स्पर्धेदरम्यान झालेल्या एका सामन्यात शॉन अॅबॉटचा उसळता चेंडू ह्युजेसच्या डोक्यावर लागला. त्या चेंडूचा वेग एवढा तीव्र होता की ह्युजेस क्षणभरात मैदानात कोसळला. ह्यजेसच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे इतर खेळाडूंनी रुग्णवाहिका मैदानावर बोलवली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, २ दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर २७ नोव्हेंबर २०१४ साली त्याची गौरवशाली जीवनयात्रा संपुष्टात आली.