SS Rajamouli | नुकतंच एका मुलाखतीदरम्यान राजामौली यांनी ‘RRR 2’ बद्दल केला मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – नुकताच एस एस राजामौली (SS Rajamouli) यांचा ‘RRR’ हा चित्रपट जपान (Japan) मध्ये देखील प्रदर्शित झाला होता. जपानमध्ये प्रेक्षकांनी या चित्रपटाला उदंड असा प्रतिसाद दिला. जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा RRR हा तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे.

 

RRR या चित्रपटाला ऑस्कर (Oscar) साठी पाठवावं अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती पण एका गुजराती चित्रपटाला पाठवल्याने अनेक चाहते निराश झाले होते. RRR हा चित्रपट अल्लुरी सितारामन राजू (Alluri Sitarama Raju) आणि कोमराम भीम (Komaram Bheem) या तेलुगु स्वतंत्र सैनिकांच्या शौर्यावर बनलेला आहे.

तर राजामौली यांनी एका मुलाखतीत ‘RRR 2’ बद्दल खुलासा केला आहे. त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की,
“माझ्या सगळ्या चित्रपटांची कथा हे माझे वडील लिहितात. सध्या मी ‘RRR 2’ बद्दल चर्चा करत आहे.
तर ते या कथेवर काम करत आहेत. एकंदरीत यावरून हा चित्रपटाचा दुसरा भाग येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर या चित्रपटाचं सादरीकरण ‘इफ्फी’ मध्ये देखील होणार आहे.
20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात पार पडणार आहे.

 

Web Title :- SS Rajamouli | filmmaker ss rajamouli gives hint about sequel of rrr rise roar and revolt 2

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | ‘… त्याशिवाय बातमी होत नाही ना’; सुप्रिया सुळेंचा गजानन कीर्तिकरांना टोला

Sanjay Raut | संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका; म्हणाले – ‘फुटिरांच्या गटात एक शिंदे कायम …’

Eng vs Pak Final | पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, जाणून घ्या काय आहे तो विक्रम?