SSC-HSC Supplementary Exam | 10 वी-12 वी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – SSC-HSC Supplementary Exam | दहावी-बारावीच्या (SSC-HSC) मुख्य बोर्ड परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पुरवणी परीक्षेचे (SSC-HSC Supplementary Exam) अर्ज भरण्यात आले. आता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक (Supplementary Exam Timetable) जाहीर करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Boards of Secondary and Higher Secondary Education) लातूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी लेखी परीक्षेचे वेळापत्रक (SSC-HSC Supplementary Exam) जाहीर केले आहे. ही परीक्षा जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेतली जाणार आहे. याबाबतची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक (Anuradha Oak) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) लेखी परीक्षा मंगळवार (दि.18 जुलै) ते मंगळवार (दि. 8 ऑगस्ट) या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) व्यवसाय अभ्यासक्रम लेखी परीक्षा मंगळवार (दि. 18 जूलै) ते शनिवार (दि. 5 ऑगस्ट) 2023 या कालावधीत होणार आहे. तर इयत्ता 10 वी लेखी परीक्षा मंगळवार (दि.18 जुलै) ते मंगळवार (दि. 1 ऑगस्ट) या कालावधीत होईल. तारीखवार तपशीलवार वेळापत्रक www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

संकेतस्थळावरील (Website) संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही केवळ माहितीसाठी देण्यात आल्याचे प्रशासनाने (Administration) सांगितले. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम राहील. छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटस्ॲप अथवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

 

 

Web Title :  SSC-HSC Supplementary Exam | ssc hsc supplementary exam schedule announced timetable available on website

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा