ST Bus Strike | ऐन दिवाळीच्या तोंडावर लाल परी थांबणार ! गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटीचा उद्यापासून संप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ST Bus Strike | ऐन दिवाळीत एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. गुणरत्न सदावर्ते (Advt Gunaratna Sadavarte) यांच्या नेतृत्वातील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेने (ST Workers Union) उद्यापासून (सोमवार) संपाची हाक दिली आहे. विलिनीकरण, सातवा वेतन आयोगासह (Seventh Pay Commission) इतर मागण्यांसाठी हा संप असणार आहे. सरकारने मागण्यांवर चर्चा करावी अन्यथा 6 नोव्हेंबरपासून आम्ही संप (ST Bus Strike) करणार आहे, असा इशारा अॅड. सदावर्ते यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) सत्तेवर होते, तेव्हाही एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 6 महिने एसटी संप केला होता. यात सरकारने काही मागण्या मान्य केल्या होत्या. दरम्यान, आता पुन्हा एकदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांसह एसटी महामंडळालाही याचा फटका बसणार आहे.

अॅड. सदावर्ते यांनी संपाची हाक दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या, गुणरत्न सदावर्ते यांना लोक आता स्विकारतील का? एसटी आंदोलन दिवाळीच्या तोंडावर सुरु करायचे म्हणजे हे एक राजकारण आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा माणूस आहे असं बोललं जात आहे.
एसटी चा बंद म्हणजे मी फडणवीस यांचा माणूस नाही हे सांगण्याचा भाबडा प्रयत्न आहे, असा टोला अंधारे यांनी लगावला. (ST Bus Strike)

सदावर्ते लबाडी करत आहेत

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस, सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले, साडे पाच महिन्यांपूर्वी प्रदीर्घ संपानंतर
एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लिखित स्वरूपात लागू झाला म्हणून आझाद मैदानात गुलाल उधळत जल्लोष केला.
आता मात्र, पुन्हा सातवा वेतन आयोगाच्या मागणीसाठी काम बंद आंदोलनाची नोटीस देणे
ही एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल नाही का? सदावर्ते वकील दाम्पत्य एसटी कर्मचाऱ्यांसोबत पुन्हा लबाडी करत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad | एकनाथ शिंदेंसोबतच्या मैत्रिवर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया,
”ते मुख्यमंत्री झाल्याने मला आनंदच झाला कारण…”