एसटी कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढलेत की ते वेडे झालेत : दिवाकर रावते

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढले आहेत की ते आता वेडे झाले आहेत असे बेजबाबदार विधान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे. औरंगाबाद येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. अगदी अहंकारी भाषेत एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्येसंदर्भात दिलेल्या या उत्तरामुळे रावतेंवर चहुबाजूने टीका होत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’96e8e1ef-cd12-11e8-a3ad-df279ae38e72′]

औरंगाबादमध्ये शहरांतर्गत बससेवा सुरु करण्यासाठी औरंगाबाद सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळादरम्यान एक करार करण्यात आला. यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रावतेंनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना हे बेताल विधान केले.

[amazon_link asins=’B0725LF4FX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’475733bb-cd13-11e8-9ef6-3f680a9e608c’]

रावते म्हणाले की , “एसटी महामंडळाचे अनेक प्रश्न आहेत, पगाराचे प्रश्न आहेत, कामाचे प्रश्न आहेत, असे पत्रकारांनी विचारल्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते उत्तर देताना अगदी अहंकारी भाषेत म्हणाले, “कुणी सांगितलं, कुठल्या सालात जगता आपण? कुठल्या सालात जगता आपण एवढंच विचारलं मी तुम्हाला. कारण कर्मचाऱ्यांचे पगार वाढलेत, आणि ते एवढे वाढलेत की तेच आता वेडे झालेत. आणि हे मी अधिकृत बोलतोय.”

महाराष्ट्रात ५ वर्षांत रस्त्यांवरील खड्ड्यांनी घेतले २००० बळी

औरंगाबाद सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळादरम्यान झालेल्या करारानुसार येत्या डिसेंबर महिन्यापासून औरंगाबाद शहरात १०० बसेस धावणार आहेत. दिवकर रावतेंच्या उपस्थितीमध्ये हा करार करण्यात आला. याच वेळी बोलताना त्यांनी होणारा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळ लवकरच रेल्वेप्रमाणे मालवाहतूकीची सेवा सुरु करणार असल्याची माहिती दिली.यावेळी बोलताना दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाचा तोटा भरुन काढण्यासाठी एसटी महामंडळ लवकरच रेल्वेप्रमाणे मालवाहतूक करणार असल्याचं म्हटले आहेत.

दिवाळीत होणारे एसटी भाडेवाढ 

दरम्यान, दुसरीकडे दिवाळी सणादरम्यान एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून एसटीच्या भाड्यात १० टक्के वाढ करण्यात येणार आहे.३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून २० नोव्हेंबरपर्यंत ही भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. महसूल वाढीच्या उद्देशानं ही भाडेवाढ दरवर्षी लागू करण्यात येते. तसे अधिकारच राज्य परिवहन प्राधिकरणानं व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत. त्याप्रमाणं दरवर्षी १०, १५, २० टक्क्यांनी सेवानिहाय भाडेवाढ लागू करण्यात येतेय, यंदा मात्र सर्व सेवांसाठी १० टक्के अशी एकसमान भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे.

[amazon_link asins=’B00NNR2SZ2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4b833498-cd14-11e8-92df-59c96fa3fbb6′]