ST Workers Strike | एसटी कामगार कामावर हजर होण्यास सुरुवात; एका दिवसांत 15,185 कामगार परतले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ST Workers Strike | मागील अनेक दिवसांपासून एसटी कामगारांचा राज्यात संप (ST Workers Strike) सुरु होता. कामगारांच्या संपामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. त्यानंतर अनेक घडामोडी झाल्यानंतर अखेर एसटी कामगारांना (MSRTC Workers) कामावर रुजु होण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या. सध्या एसटी कामगार कामावर दाखल होताना दिसत आहेत. काल (सोमवारी) एका दिवसांमध्ये 15,185 एसटी कामगार कामावर परतले आहेत. (MSRTC Employees Start Returning To Work)

एसटी कामगार कामावर हजर होत असल्याने चार दिवसांत एसटी पूर्ण क्षमतेने सुरू होईल असा एसटी प्रशासनाला विश्वास आहे. त्याचबरोबर नव्याने हजर होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना एक दिवसाचे जुजबी प्रशिक्षण देण्यात येणार असे परिवहन मंडळाकडून (MSRTC) सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता ‘लालपरी’ पुन्हा रस्त्यावर पूर्ण क्षमतेने धावणार आहे. (ST Workers Strike)

दरम्यान, काल (सोमवारी) एका दिवसांत एसटी महामंडळातील 15 हजार 185 कामगार कामावर परतले आहेत. आतापर्यंत 82 हजार 108 कर्मचाऱ्यांपैकी 61 हजार 647 कर्मचारी कामावर हजर आहेत, तर 20 हजार 461 कर्मचारी कामावर अजुन बाकी आहेत. प्रशासकीय 12 हजार 6, कार्यशाळा 15 हजार 781, चालक 29 हजार 485 तर वाहक 24 हजार 826 कर्मचारी हजर आहेत. असे समजते.

नुकतंच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कामगारांना कामावर दाखल होण्याच्या सूचना दिल्या आहे.
न्यायालयाच्या म्हणण्यानुसार एसटी कामगार 22 एप्रिलपर्यंत हजर न झाल्यास
त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
तसेच त्यांची सेवा समाप्ती देखील केली जाणार असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, त्याआधी एसटी कामगारांनी परतीची वाट पकडली आहे. बहुतांश कामगार कामावर दाखल झाल्याचे दिसत आहे.

Web Title :- ST Workers Strike | MSRTC employees start returning to work 15185 employees attend in one day

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा