ST Workers Strike | पुण्यात ‘लाल परी’ला लागला ब्रेक ! विभागातील ST ची सर्व वाहतूक ठप्प; दिवाळीनंतर परत गावी जाणार्‍यांचे हाल सुरु

पुणे : ST Workers Strike | विदर्भात सुरु असलेल्या एस टी कामगारांच्या संपाचे (ST Workers Strike) लोण पुणे जिल्ह्यातही पसरले असून सोमवारी सकाळपासून जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये संप सुरु झाला आहे. त्यामुळे रात्री निवासी आलेल्या गाड्या वगळता आज लाल परीची चाके पूर्णपणे थांबली आहेत.

दिवाळीच्या तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज सोमवारपासून शासकीय तसेच खासगी कार्यालये सुरु झाली आहेत. मात्र, दिवाळी सुट्टीसाठी गावी गेलेल्यांना परत येण्यासाठी एस टी गाड्या उपलब्ध झाल्या नाहीत. विदर्भ, मराठवाड्यात दिवाळीतही एस टी कर्मचार्‍यांचा संप सुरु होता. पुणे (Pune) जिल्ह्यात १३ आगार असून त्यापैकी रविवारी तीन आगार बंद झाले होते. सोमवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये संप सुरु झाला आहे. फक्त रात्री मुक्कामी आलेल्या गाड्या आज सकाळी त्यांच्या डेपोमध्ये परत गेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व एस टी स्थानकातील बस वाहतूक बंद झाली आहे.

यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. पुणे शहरातून जिल्ह्यातील (Pune ST Workers Strike) जवळच्या गावांना जाण्यासाठी एस टी बसशिवाय अन्य कोणतेही साधन उपलब्ध नाही.
त्यामुळे या गावांमध्ये वेगवेगळ्या कामासाठी तसेच कामावर जाणार्‍या कर्मचार्‍यांचे मोठे हाल झाले आहेत.
बाहेरगावाहून आलेल्या शेकडो लोकांना नेहमीपेक्षा दुप्पट पैसे मोजावे लागले आहेत.
त्याचा मोठा फटका सामान्यांना बसला आहे.

एस टी संपाबाबत मुंबईत आज न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी सुरु आहे.
यामध्ये काय निर्णय होतो, सरकार (Maharashtra Government) काय म्हणणे मांडते यावर या संपाचा निर्णय होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील एस टीची वाहतूक ठप्प झाली आहे.

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Central Government Employees | लाखो सरकारी कर्मचारी आणि अधिकार्‍यांना मिळणारी ‘ही’ सुविधा 8 नोव्हेंबरपासून बंद; जाणून घ्या नवीन नियमावली

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : ST Bus travelling stop in Pune! All ST workers on strike

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update