ST Workers Strike | एसटी महामंडळाने 189 निलंबित कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ST Workers Strike | एसटी महामंडळाचे (MSRTC) विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी (ST Workers Strike) ठाम आहेत. महामंडळाने कामगारांना अंतरिम वेतनवाढ, निलंबन करूनही कर्मचारी कामावर येण्यास तयार होत नाही. त्यामुळे आता महामंडळाने निलंबित (Suspended) कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. बुधवारी तब्ब्ल 189 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. त्यामुळे आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या एक हजार 333 वर पोहोचली आहे. याशिवाय आतापर्यंत महामंडळाने 11 हजार 024 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

संप मागे घेण्याबाबत महामंडळाने वारंवार आवाहन केले. मात्र कर्मचारी निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे निवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालक कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. महामंडळाने आतापर्यंत 11,024 कर्मचाऱ्यांना निलंबित केले, तर 2796 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. निलंबन कारवाई नंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. (ST Workers Strike)

महामंडळाने (MSRTC) कठोर पावले उचलत निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस देण्यास सुरुवात केली आहे.
तीन हजार 79 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
तर 189 निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या एक हजार 333 वर पोहोचली आहे.

55,000 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा –

विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे. वास्तविक एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला तरी अद्याप कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत.
त्यामुळे महामंडळाने कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे.
त्यानुसार कामावर हजर न होणाऱ्या 55 हजार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Web Title :-  ST Workers Strike | ST Corporation fires 189 suspended employees now they are dismissed

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | दुर्देवी ! पुण्यातील धायरीजवळ टँकर-दुचाकीचा भीषण अपघात; वृषाली तांबेंचा जागीच मृत्यु

 

Pune Crime | धक्कादायक ! जिवंत पत्नीचा तयार केला मृत्यू दाखला; पतीसह 7 जणांवर FIR, प्रचंड खळबळ

 

Corona in Mumbai | मुंबई महानगरपालिकेत ‘कोरोना’चा शिरकाव, अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित