ST Workers Strike | संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी दिला स्पष्ट शब्दात ‘हा’ इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अद्याप सुरुच आहे. काही कर्मचारी कमावर परतले आहेत तर काहीजण संपावर ठाम आहेत. त्यामुळे संपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) वेळोवेळी आवाहन करुनही काही कर्मचारी संपावर (ST Workers Strike) ठाम आहेत. जे कर्मचारी संपावर ठाम आहेत अशांना एसटी महामंडळाकडून (MSRTC) नोटीस पाठवण्यात आली आहे. तर काहींना निलंबित (Suspend) तर काहींना बडतर्फ करण्यात आले आहे. तरी देखील कर्मचारी संपावर ठाम आहेत. संपकरी कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. आता यापुढे फार काही होणार नाही, असे पवार यांनी सांगितले.

 

एसटी कर्मचारी संपाबाबत (ST Workers Strike) परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी शेवटचे आवाहन केले आहे. आता यापुढे फार काही होणार नाही. कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका न घेता विद्यार्थी (Student) आणि जनतेचा (Public) विचार करावा. त्यांनी आपला संप मागे घ्यावा, असे आवाहन अजित पवार यांनी संपकरी कर्मचऱ्यांना केले आहे. त्यामुळे आता कर्मचारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील एसटी सुरु व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कृती समितीची बैठक झाली. यावेळी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु कर्मचारी अद्याप कामावर हजर झालेले नाहीत.
तसेच संपात फूटही पडली तरी काही कार्मचारी संपावर ठाम आहेत.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये (State Government) विलिनिकरण (Merger) करावे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

 

दरम्यान, एसटी पुन्हा सुरु करुन प्रवाशांचे हाल थांबले पाहिजेत, असेच राज्य सरकारचे म्हणणे आहे.
तरीही काही एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्याने पुन्हा एकदा अजित पवार यांनी शेवटचा इशारा दिला आहे.
यापुढे काहीही मिळणार नाही, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले आहे.

 

Web Title :- ST Workers Strike | st workers strike ajit pawars warning to MSRTC employees in clear words

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raosaheb Danve | अजित पवारांच्या विधानावर रावसाहेब दानवेंचा टोला; म्हणाले – ‘उद्या ते असंही म्हणतील की महिलाही…’

 

PM Kisan Yojana | खुशखबर ! पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना अल्प दरात मिळणार कर्ज; जाणून घ्या

 

Multibagger Stocks | 39 रुपयांच्या ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने 1 लाख रुपयांचे 7 वर्षात बनवले 67 लाख रुपये, जाणून घेवूयात एका दृष्टीक्षेपात