ST Workers Strike | ‘विलीनीकरणाची मागणी मान्य होऊ शकत नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  ST Workers Strike | एसटी महामंडळाचे सरकारी सेवेत विलीनीकरण करावे या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून एसटी कामगारांंनी राज्यव्यापी संप (ST Workers Strike) पुकारला आहे. राज्यभरात एसटीला ब्रेक लागला आहे. कामगारांचे आंदोलन आणखी तीव्रच होताना दिसत आहे. एसटी कामगारांच्या संपाबाबत आज (शनिवारी) सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे देखील उपस्थित होते.

 

अनिल परब (Anil Parab) म्हणाले, समितीने जर विलीणीकरणाबाबत सकारात्मक अहवाल दिला तर प्रश्न सुटेल मात्र,
जर अहवाल नकारात्मक दिला तर काय करायचं म्हणून, आता सध्या याबाबत निर्णय घेता येणार नाही असं ते म्हणाले.
बैठकीत विलीणीकरणाच्या बाबतची मागणी होती पण ही मागणी आम्ही मान्य करू शकत नाही असं सांगितलं.
कारण हे प्रकरण उच्च न्यायालयात (High Court) आहे. 12 आठवड्यांचा वेळ समितीला दिलेली असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे.

आम्ही हवं तर वेळ कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो असं परब यांनी सांगितलं आहे.
तसेच, वेतन वाढीच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, शासकीय कर्मचाऱ्यांच्या (ST Workers Strike) वेतनानुसार विचार करू अस सांगितलं आहे.
संप चालणं हे एसटीसाठी आणि त्यांच्यासाठीही योग्य नाहीये. माझ्या बाजूने सगळं सांगितलं आहे.
एसटी कामगारांनी लवकरात लवकर संप मागे घ्यावा अशी विनंती देखील त्यांनी पुन्हा केली.
दरम्यान, शरद पवारांशी (Sharad Pawar) सकाळी माझी भेट झाली चर्चा झाली असून, या मुद्दावर कसा तोडगा काढता येईल यावर चर्चा झाली असं देखील ते म्हणाले.

 

Web Title : ST Workers Strike | st workers strike demand for msrtc merger in state government cannot be accepted said minister anil parab

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

UPSC Recruitment 2021 | भारत सरकारच्या विविध विभागात अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, पगार देखील लाखात

Director Ramkumar Shedge | कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी बद्दल दिग्दर्शक रामकुमार शेडगे विशेष पुरस्कार देऊन सन्मानित

Gadchiroli | गडचिरोलीमध्ये पोलिस अन् नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक ! मोठ्या नेत्यासह 26 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’, 4 पोलिस जखमी