धुळे : जिल्हा मुद्रांक विक्रेता व दस्त लेखक महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय मेळावा संपन्न

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील संतोषी माता चौकातील सैनिकी लॉन मध्ये धुळे जिल्हा मुद्रांक विक्रेता व दस्त लेखक महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याचे दिप प्रज्वलन आमदार मंजुळा गावीत यांचे हस्ते करण्यात आले.

मुद्रांक विक्रेता व दस्त लेखक असुन हे ब्रिटीश काळा पासुन हा विक्री व्यवसाय करत आहे. शासनाला जास्तीत जास्त महसुल मिळवून देणारा एक अविभाज्य घटक आहे.शासनाचे याचेवर घाला घालण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. बनावट मुद्रांकाचे नावाखाली आदेश मागे घेणे बाबत शासन मान्य मुद्रांक विक्रेता यांनी आज मेळाव्यात हे धोरण मान्य नाही. यामुळे या व्यवसायावर खिळ बसविण्याचा प्रयत्न शासन करत आहे.

शासन निर्णय क्रमांक दि.26/12/2012 रोजीचे आदेश नुसार मुद्रांक विक्रेत्यांना रुपये 30,000 हजार पर्यत विक्रीची अनुमती मिळावी, 23/1/2015 चे परिपत्रक रद्द करावे, इ-चलन द्वारे मुद्रांक विक्रेत्यास मनोती (कमिशन) मिळावे तसेच मुद्रांक विक्रेत्यांचे व दस्त लेखकाचे मृत्युचे पश्चात त्यांचे वारसांना सुध्दा मुद्रांक विक्रीची अनुमती मिळावी. शासनाने सगळ्या मागण्या मान्य कराव्या असा ठराव ह्या बैठकीत मंजुर करण्यात आला. शासनाला जागे करण्यासाठी राज्य स्तरावर मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा हि देण्यात आला आहे.

मेळाव्यात सदर लेखी स्वरुपाचे निवेदन आमदार मंजुळा गावीत यांना मुद्रांक विक्रेत्या संघाच्या वतीने देण्यात आले. आमदार गावीत यांनी मुद्रांक विक्रेत्यांना आश्वस्त केले की आपल्या मागण्यासाठी शासन दबारबारी प्रयत्न करु, आपल्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करु. मुद्रांक विक्रेत्यांची समस्या, अडचणी बाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे समोर मांडुन चर्चा व बैठकीतून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बैठकीत अध्यक्ष रामराव पाटील, कार्याध्यक्ष दिलीप देवरे, बी. एन. बिरारीस, डॉ.तुळशिराम गावीत, राजेंद्र कुलकर्णी, शांताराम वाघ आदी उपस्थित होते. मेळाव्यास मुद्रांक विक्रीते व दस्तलेखक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like