home page top 1

SBI नं FD वरील व्याजदर सहाव्यांदा घटवलं, ज्येष्ठ नागरिकांचं होणार अधिक नुकसान, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) फिक्स्ड डिपॉझिट (FD) ठेवले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण बँकेने मुदत ठेव योजनेचे (FD) व्याजदर बदलले आहेत. एक ते दोन वर्षे मुदतीच्या एफडीवरील व्याजदरात मोठी कपात केली आहे. यामुळे लाखो ग्राहकांचे नुकसान होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून एफडीचे तब्बल सहा वेळा दर बदलले आहेत. एसबीआयच्या या नवीन नियमांनंतर देशातील अन्य बँकाही व्याज दर कमी करण्याची शक्यता आहे.

नवीन व्याजदर –

एसबीआयने कमी अवधीच्या कमी रकमेच्या एफडीवर व्याज कमी केले आहे. 0.10 टक्क्यांनी घटविले आहे. तर जास्त रकमेच्या एफडीवर 0.30 टक्क्यांनी घट केली आहे. तसेच बचत खात्यामध्ये 1 लाख रुपये ठेवणाऱ्यांच्या व्याजामध्ये 3.50 वरून 3.25 एवढी कपात केली आहे.

संभाव्य परिणाम –

एसबीआयने व्याजदर कपात केल्याने 50 लाख रुपयांच्या एफडीवर वर्षाला 5000 रुपयांचे नुकसान होणार आहे. याचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांवर सर्वाधिक होणार आहे. जवळपास 4.1 कोटी ज्येष्ठ नागरिकांचे एफडी खात्यांमध्ये 14 लाख कोटी रुपये आहेत.

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी रेपो रेटमध्ये बदल –

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आरबीआय प्रयत्नशील आहे. यामुळे रेपो रेट कमी केला जात आहे. रेपो रेट सातत्याने बदलत असतो. यामुळे जमा असलेल्या रक्कमेचे व्याजही बदलत राहणार आहे. 4 ऑक्टोबरला हा दर कमी करण्यात आला होता.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like