राजस्थानात 10 ते 24 मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा ! विवाहांवर प्रतिबंध, सार्वजनिक वाहतुकीला सुद्धा ‘ब्रेक’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – राजस्थान सरकारने राज्यात कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकरणात वाढ झाल्याने 10-24 मे पर्यंत कम्प्लीट लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने गुरुवारी आदेश जारी करत म्हटले की, 10 मे रोजी सकाळी 5 वाजतापासून 24 मे सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन राहील. सरकारने स्पष्ट केले की, राज्यात लॉकडाऊनच्या दरम्यान विवाह होणार नाहीत. राज्यात विवाह समारंभ 31 मे 2021 च्या नंतरच आयोजित केले जातील.

गुरुवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यांच्या कॅबिनेट बैठकीत ग्रामीण क्षेत्र आणि तरूण वर्गात वाढत असलेला कोरोना संसर्ग आणि मृत्यूंच्या संख्येवर चिंता व्यक्त केली. सरकारने लॉकडाऊनबाबत मार्गदर्शक तत्त्वात म्हटले की, राज्यात कोणत्याही प्रकारचे समारंभ, डीजे, वरात आणि भोजन इत्यादीला परवानगी 31 मेपर्यत मिळणार नाही.

– विवाह घरीच अथवा कोर्ट मॅरेज सारखे करा. 11 व्यक्तींना परवानगी असेल. सामुहिक भोजन होणार नाही
– ग्रामीण भागात मनरेगा काम बंदर राहील. धामिक स्थळं बंद राहतील. राज्याच्या बाहेरून आलेल्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी अहवाल आवश्यक.

– अत्यावश्यक सेवा सोडून सर्व वाहनांची वाहतूक बंद राहील. वर्‍हाडींच्या आगमनासाठी बस, ऑटो टॅम्पो, ट्रॅक्टर, जीप साठी परवानगी असेल.

– माल वाहतूकीसाठी आणि त्यासंबंधीत कामांसाठी ठराविक व्यक्तींना परवानगी असेल.
– याशिवाय राज्यात मेडिकल आणि इतर अत्यावश्यक सेवा सोडून एका जिल्ह्यातून दुसरा जिल्हा, एका शहरातून दुसर्‍या शहरात, शहरातून गावात आणि एका गावातून दुसर्‍या गावात सर्वप्रकारच्या वाहतुकीवर प्रतिबंध असेल.