देवीभोयरे येथे राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे आयोजन

पारनेर : पोलीसनामा ऑनलाईन

पारनेर तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या देवीभोयरे येथे अंबिका मातेच्या नवरात्रौत्सवानिमित्त राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचा उदघाटन सोहळा १० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले यांच्या शुभहस्ते होणार असून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री सुजित झावरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमासाठी डी. जी. ग्रुपचे चेअरमन श्री देवेंद्र शेठ गायकवाड, जी.प सदस्या श्रीम. पुष्पाताई वराळ , नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के, पी एस आय भुजबळ मॅडम, नगरसेवक कोंडीभाऊ तिकोने व श्री भिमाशेठ घुले उपस्थित राहणार आहेत .

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2fd5ba10-cafe-11e8-8725-b725a0decd90′]
अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी अंबिका माता देवीचा नवरात्र उत्सव १० आॅक्टोंबरपासून सुरू होत आहे . पारनेर तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून नावलौकिक असलेली देवीभोयरे गावची अंबिका मातेच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण राज्यातून लाखो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनास येतात. नवरात्रीनिमित्त देवीभायीर येथे गेली ४० वर्षे अखंड पणे राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. याही वर्षी अतिशय दर्जेदार नाट्य स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे , अशी माहिती नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष संपतराव वाळुंज यांनी दिली. नाट्यस्पर्धेबरोबरच इतरही करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले असून नवोदित कलाकारांनी सहभाग घेण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष संपतराव वाळुंज यांनी केले आहे. विशेष म्हणजे नवरात्र उत्सवात संपूर्ण प्लॅस्टिक बंदीचा निर्णय देखील करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B078T9SVFN,B073YDY5PR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3e746709-cafe-11e8-8ecc-bb0dce99ba0a’]

सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी तसेच ग्रामस्थांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन सर्व देवभोहिरे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b753173c-cafe-11e8-a64d-a9b60297457e’]