Sterilisations Of Dogs By PMC Pune | भटक्या कुत्र्यांची नसबंदी व उपचारासाठी महापालिकेचा कॅनाईन कंट्रोल ऍन्ड केअर संस्थेसोबत संयुक्त प्रकल्प; नायडू आणि बाणेर येथील डॉग पॉंडमध्ये दरमहा होणार 700 कुत्र्यांची नसबंदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sterilisations Of Dogs By PMC Pune | शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी महापालिका कॅनाईन कंट्रोल ऍन्ड केअर या खाजगी संस्थेसोबत नायडू हॉस्पीटल (Naidu Hospital Pune) जवळील डॉग पॉंड आणि बाणेर (मोहननगर) Baner Dog Pound येथील डॉग पॉंड येथे दरमहा ७०० कुत्र्यांची मोफत नसबंदी (Free Neutering Of Dogs) करण्याच्या संयुक्त प्रकल्प राबविणार आहे. पाच वर्षासाठीच्या प्रकल्पासाठी जागा, पाणी व वीज व्यवस्था महापालिका करून देणार असून शस्त्रक्रिया, औषधोपचार, लसीकरण, सेवकवर्गाचा सर्व खर्च कॅनाईन कंट्रोल ऍन्ड केअर (Canine Control And Care) ही संस्था करणार असून यासंदर्भातील करार करण्यास आज महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी मान्यता दिली. (Sterilisations Of Dogs By PMC Pune)

 

महापालिकेच्या स्थायी समितीपुढे (PMC Standing Committee) यासंदर्भातील प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता.
या प्रस्तावानुसार महापालिका व कॅनाईन कंट्रोल ऍन्ड केअर ही संस्था मिळून संयुक्तरित्या हा उपक्रम राबविणार आहे.
नायडू येथील डॉग पॉंडमध्ये दरमहा ४०० तर बाणेर येथील डॉग पॉंडमध्ये दरमहा ३०० भटक्या कुत्र्यांवर नसबंदी करण्यात येणार आहे.
डॉग पॉंड व त्यामधील इतर साहित्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी संस्थेची राहाणार आहे. (Sterilisations Of Dogs By PMC Pune)

करारनामा कालावधीत सदर ठिकाणी कोणत्याही स्वरुपाचे आर्थिक उत्पन्न घेता येणार नाही.
महापालिका हद्दीतील व नव्याने समाविष्ट गावांतील भटक्या व मोकाट अपघातग्रस्त कुत्र्यांवरील उपचारासाठी १० केनेल्स राखीव ठेवण्यात येणार आहेत.
भटकी कुत्रे पकडणे, शस्त्रक्रिया करणे व पुन्हा ही कुत्रे त्यांच्या जागेवर सोडणे याचा सर्व खर्च आणि जबाबदारी ही संबधित संस्थेवर राहाणार आहे.

 

Web Title :- Sterilisations Of Dogs By PMC Pune | Joint project of Pune Municipal Corporation with Canine Control and Care for Sterilisations Of Dogs; The dog ponds at Naidu and Baner will be neutered by 700 dogs per month

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

V Mart Story | कर्ज घेवून सुरू झालेले फोटोकॉपीचे दुकान ते 1000 कोटीची कंपनी, जाणून घ्या कसे उभे राहीले व्ही मार्ट

 

Pune PMC Action | स्टॉल्सचे बेकायदेशीररित्या ‘गाळ्यांमध्ये’ रुपांतर ! बिबवेवाडी गावातील स्टॉलधारक अडचणीत; महापालिकेने बिबवेवाडी रस्त्यावरील तब्बल 67 गाळे केले सील

 

Pune Crime | पुण्यात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त