ICC World Cup 2019 : ‘हा’ स्टार खेळाडू ‘अंघोळ’ करताना देखील करतो ‘बॅटिंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ त्यांच्या खेळासाठी ओळखला जातो. क्रिकेटमध्ये ते कुठेही तडजोड करताना दिसत नाहीत. मैदानावर ते विरोधी संघाला चीतपट करण्यासाठी उतरलेले दिसून येतात. यासाठी ते मोठ्या प्रमाणात सराव देखील करत असतात. माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथबद्दल बोलले जाते कि तो २४ तास फलंदाजीचा सराव करत असतो किंबहुना तो करू शकतो. त्याच्या या सवयीमुळे संघ सहकारी आणि मॅनेजमेंटला कधी कधी फटका देखील बसत असतो.

वर्ल्डकपच्या आधी ऑस्ट्रेलियाचा सहाय्यक प्रशिक्षक रिकी पॉंटिंग हा हॉटेलच्या लॉबीमध्ये फिरत असताना त्याला विचित्र आवाज आला. कुणीतरी फलंदाजीचा सर्व करत आहे असं त्या आवाजावरून त्याला वाटले. त्यानंतर तो त्या रूमजवळ गेला असता ती रूम स्टीव्ह स्मिथ याची असल्याचे त्याच्या लक्षात आले. यावेळी स्मिथ अंघोळ करत असल्याचे त्याच्या लक्षात आले. मात्र त्याने स्मिथला कळू न देता तो तिथून निघून गेला.

त्यानंतर हि माहिती समोर अली असता स्टीव्ह स्मिथ याने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले कि, माझ्या बाथरूममध्ये देखील जासूसी केली जात आहे का? सरावाविषयी विचारले असता तो म्हणाला कि, हो मला हि सवय आहे. कुठेही वेळ मिळाला कि, मी सरावाला सुरुवात करत असल्याचे देखील त्याने यावेळी सांगितले.

दरम्यान, त्याच्या या सवयीमुळे संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंना देखील त्रास होत असल्याचे अनेक खेळाडूंनी बोलून दाखवले आहे. त्याचबरोबर संध्याकाळी झोपताना तो त्याच्या बॅटशिवाय झोपत नसल्याची देखील माहिती त्याने यावेळी दिली.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.