Stock Market | दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी बाजारात प्रवेशाची जबरदस्त संधी, सप्टेंबरपर्यंत थांबेल घसरण!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Stock Market | या आठवड्याच्या पहिल्या तीन दिवसांत शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली असून, त्यामुळे गुंतवणूकदारांवर धनवर्षाव झाला आहे. मात्र, अनिश्चिततेच्या वातावरणात सध्या बाजारात येण्यास अनेकांना भीती वाटत आहे. त्यांची भीती रास्त आहे. कारण सेन्सेक्स आता त्याच्या सार्वकालिक उच्चांकाच्या जवळपास 7,000 अंकांच्या खाली व्यवहार करत आहे. मात्र, बाजार तज्ज्ञांच्या मते, आता बाजारात गुंतवणूक करण्याची वेळ आली आहे. (Stock Market)

 

ब्रोकरेज हाऊस आशिका ग्लोबलचे संस्थापक अमित जैन सांगतात की, बाजारातील अस्थिरतेमुळे जे आतापर्यंत यापासून दूर होते, त्यांच्यासाठी आता गुंतवणुकीची उत्तम संधी आहे. ते म्हणाले की दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी या टप्प्यावर खरेदी सुरू करावी. मनीकंट्रोलमधील एका बातमीनुसार, जैन म्हणाले की, सप्टेंबर 2022 पर्यंत बाजारात प्राईस करेक्शन आणि टाइम करेक्शन दोन्ही थांबताना दिसतील. जैन यांच्या मते, यावेळी आयटी आणि हेल्थकेअर शेअरमध्ये खरेदीच्या चांगल्या संधी आहेत. (Stock Market)

 

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगली संधी
गुंतवणूकदारांनी आयटी कंपन्यांमध्ये दीर्घ मुदतीसाठी पैसे गुंतवावेत, असे अमित जैन यांनी म्हटले आहे. भविष्यात त्यांचे उत्पन्न वाढण्याची चांगली शक्यता दिसत असल्याचे ते म्हणाले. त्याच वेळी, त्यांनी अल्प आणि मध्यम मुदतीच्या गुंतवणूकदारांना आणखी चांगल्या स्तरासाठी 3-6 महिने प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला आहे.

 

जैन म्हणतात की सप्टेंबरपर्यंत अमेरिका तांत्रिक मंदीच्या सर्वात वाईट टप्प्यातून बाहेर पडताना दिसेल. मात्र, यादरम्यान चीन आणि तैवान किंवा इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध झाले नाही तरच तेजीची स्थिती निर्माण होईल.

चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची उत्तम संधी
जैन म्हणाले की, नुकत्याच झालेल्या सुधारणांमुळे गुंतवणूकदारांना निवडक क्षेत्रे आणि शेअरमध्ये खरेदी करण्याची उत्तम संधी मिळाली आहे.
ते म्हणाले की, लाँग टर्म बुल मार्केटमधील घसरण आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि काही शेअरमध्ये पुढील काळात सुधारणा दिसू शकते,
परंतु प्राईस करेक्शन जवळपास सर्व शेअरमध्ये आपल्या बॉटमवर पोहचले आहे.

 

आयटीवर डाव
ते म्हणाले की, आयटी इंडेक्स 39,600 च्या पिकवरून जवळपास 40 टक्क्यांनी घसरला आहे
आणि त्याचा लाँग टर्म अ‍ॅव्हरेज सुमारे 17,000 आहे. नुकत्याच झालेल्या घसरणीनंतर तो 26500 च्या आसपास पोहोचल्याचे जैन सांगतात.
अशावेळी, गुंतवणूकदारांनी अशा आयटी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे ज्यांच्या उत्पन्न वाढीची शक्यता जास्त चांगली दिसत आहे.

 

Web Title :- Stock Market | money making tips earn money stock market great opportunity for long term investors the decline in market will stop by september

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Stamp Duty | मुद्रांक शुल्क चुकविल्याच्या प्रकरणातील दंडात 90 टक्के सवलत जुलै अखेरपर्यंतच

 

Cyber Insurance Policy | ऑनलाईन फ्रॉडचे नुकसान टाळायचे असेल तर घ्या सायबर विमा पॉलिसी, जाणून घ्या तिचे फायदे

 

Pune -Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर सोलापूर प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात, अव्वल कारकूनाचा जागीच मृत्यू