शेअर बाजारामध्ये मोठी घसरण : सेन्सेक्स 600 आणि निफ्टी 160 अंकांनी घसरून बंद, बुडाले 1.59 लाख कोटी रुपये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – युरोपमध्ये पुन्हा कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे आणि अमेरिकेच्या निवडणुकीविषयी सुरू असलेल्या चिंतेमुळे जगभरातील शेअर बाजारामध्ये घसरण झाली आहे. हाच परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून आला. BSE चा 30 समभागांचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 600 अंकांनी घसरून 39,922 वर बंद झाला. त्याचबरोबर NSE चा प्रमुख 50 निर्देशांक असलेला इंडेक्स निफ्टी 160 अंकांनी खाली आला आहे. या घसरणीत गुंतवणूकदारांचे 1.59 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

शेअर बाजारामध्ये तीव्र घसरण –
बँकिंग शेअर्सचा आज सर्वाधिक परिणाम दिसून आला. बँक निफ्टीमध्ये सुमारे 600 अंकांची घसरण झाली. बँक निफ्टी अखेर 537 अंकांची घसरून 24,233 वर बंद झाला. त्याच वेळी, मिडकॅप 170 अंकांनी खाली 17,048 वर बंद झाला. सेन्सेक्सच्या 30 पैकी 25 समभागांची विक्री झाली. निफ्टीच्या 50 पैकी 41 कंपन्यांची घसरण झाली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 11 समभाग खाली आले.

शेअर बाजारात का झाली घसरण –
एस्कॉर्ट सिक्युरिटीचे संशोधन प्रमुख असिफ इक्बाल यांनी सांगितले की, अमेरिकेत निवडणुकीची तारीख जवळ येत आहे. अशा परिस्थितीत राजकीय अस्थिरतेच्या गंभीर चिंतेने बाजाराचे मूड खराब झाले आहेत. कारण कोणते ना कोणते सर्वे सतत येत आहे, तर काहींमध्ये सध्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प मागे पडलेले दिसत आहेत. ज्यामुळे बाजारपेठेतील अस्थिरता वाढत आहे. त्यांनी सांगितले की मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, निवडणुकीनंतर मदत पॅकेज जाहीर केले जाईल. कारण, रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रॅट यांच्यात या विषयावरील चर्चा योग्य दिशेने पोहोचत नाहीत. म्हणूनच, बाजारावरील दबाव वाढला आहे.

आता गुंतवणूकदारांनी काय करावे –
आसिफ इक्बाल म्हणतात की गुंतवणूकदारांनी घाबरू नये. त्याऐवजी घसरणीवर चांगल्या शेअर्सवर डाव लावला पाहिजे. दरम्यान, पुढील एक महिना आणि शेअर बाजार अत्यंत अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे. कारण अमेरिकेत 3 नोव्हेंबरला राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी खबरदारी घ्यावी.