‘युद्धासाठी तयार राहा’ ! ‘कोरोना’च्या जागतिक ‘महामारी’ दरम्यान चीनच्या राष्ट्रपतींनी लष्कराला सांगितलं

बिजिंग : वृत्त संस्था – कोविड-19 जागतिक महामारीदरम्यान चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी मंगळवारी देशाच्या सुरक्षा दलांना निर्देश दिले की, त्यांनी जवानांचे ट्रेनिंग मजबूत करावे आणि युद्धासाठी तयार राहावे. तेथील सरकारी मीडियाने म्हटले आहे की, राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे पूर्णपणे रक्षण आणि देशाची समग्र धारणात्मक स्थिरता यांचे रक्षण करण्यासाठी जवानांच्या प्रशिक्षणाला व्यापक प्रमाणात मजबूत करणे आणि युद्धासाठी तयार करणे महत्वपूर्ण आहे.

राष्ट्रपती शी जिनपिंग म्हणाले – युद्धासाठी तयार राहा

त्यांचे हे भाषण अशावेळी आले आहे जेव्हा अमेरिकेसोबत तणाव टोकाला पोहचला आहे. तसेच स्थानिक राजकीय नेते आणि राज्यकर्त्यांकडून बळाचा वापर करून तैवान ताब्यात घेण्याबाबत वक्तव्य केले जात आहे. सोबतच, हाँगकाँगच्या विशेष प्रशासकीय क्षेत्रात नवीन आणि वादग्रस्त कायदा लागू केला जाऊ शकतो, जेणेकरून हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

चीनचा भारतासोबतही तणाव वाढत चालला आहे. 5 मे रोजी लडाखमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाल्यानंतर दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्यबळ वाढवले आहे. जाणकारांचे म्हणणे आहे की, हा तणाव दिर्घकाळ चालू शकतो. मात्र, भारताच्या बाजूने चीनची 3488 किलोमीटरची मोठी वादग्रस्त सीमा आहे आणि विविध भागात दोन्ही देशाच्या सैन्यामध्ये वाद होत असतो.

राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पुढे म्हटले की, कोविड-19 विरोधातील लढाईत चीनची कामगिरी मिलिट्री रिफॉर्मचे यश दर्शवते आणि आर्म्ड फोर्सेजला महामारीशिवाय ट्रेनिंगचे नवे पर्याय शोधले पाहिजेत.

चीनच्या शक्तिशाली केंद्रीय सैन्य आयोगाचे (सेंट्रल मिलिट्री कमिशन) अध्यक्ष असलेले शी जिनपिंग यांनी हे वक्तव्य नॅशनल पीपल्स काँग्रेस (एनपीसी) च्या वार्षिक सत्रात पीपल्स लिब्रेशन आर्मी (पीएलए) आणि पीपल्स आर्म्ड पोलीस फोर्स (पीएपीएफ) च्या प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीत केले.

भारत-चीनच्या स्थितीवर चर्चा करणार टॉप लष्करी कमांडर

भारतीय लष्कराचे वरिष्ठ कमांडर बुधवारपासून होत असलेल्या तीन दिवसीय संमेलनात पूर्व लडाखच्या काही भागात भारत आणि चीन सैनिकांमध्ये असलेल्या तणावाच्या स्थितीचा आढावा घेतील. कमांडर जम्मू-काश्मीरच्या स्थितीवर देखील चर्चा करतील. यासोबतच राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम करणार्‍या मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे.

संमेलनात प्रामुख्याने लक्ष पूर्व लडाखच्या स्थितीवर असेल. जेथे पँगोंग त्सो, गल्वान घाटी, देमचोक आणि दौलत बेग ओल्डीमध्ये भारतीय आणि चीनी सैनिक आमने-सामने आले आहेत. या भागातील सर्व संवेदनशील क्षेत्रात भारत आणि चीन दोघांनी आपले अस्तित्व महत्वपूर्ण रूपाने वाढवले आहे, यातून संकेत मिळतात की, या वादावर लवकर मार्ग निघणे अवघड आहे. दोघांकडून चर्चेतून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

5 मे च्या घटनेनंतर भारत-चीनमध्ये स्थिती तणावपूर्ण

पूर्व लडाखमध्ये स्थिती तेव्हा बिघडली जेव्हा 5 मे च्या सायंकाळी सुमारे 250 चीनी आणि भारतीय जवानांमध्ये संघर्ष घाला आणि तो दुसर्‍या दिवशीसुद्धा सुरूच होता. जेव्हा स्थानिक कमांडरस्तरावर दोन्ही बाजूने वेगळे होण्यावर सहमती झाली तेव्हा हा संघर्ष थांबला. या हिंसेत 100 पेक्षा जास्त भारतीय आणि चीनी सैनिक जखमी झाले.

पँगोंग त्से मध्ये झालेल्या या घटनेनंतर 9 मे रोजी उत्तर सिक्किममध्ये सुद्धा अशाच प्रकारची घटना घडली. लष्कराचे प्रवक्ता कर्नल अमन आनंद यांनी विस्तृत माहिती न देता थोडक्यात सांगितले की, भारतीय लष्कराचे वरिष्ठ स्तरीय नेतृत्व निर्माण झालेली सध्याची सुरक्षा आणि प्रशासकीय आव्हानांच्या सोबतच भारतीय लष्कराच्या भविष्यावर चर्चा होईल. कमांडरचे हे संमेलन यापूर्वी 13 ते 18 एप्रिल रोजी होणार होते, परंतु कोरोना व्हायरसमुळे ते स्थगित केले होते.