Coronavirus : ‘कोरोना’मधून बरी झाली सिंगर कनिका कपूर, रिपोर्ट आले ‘निगेटिव्ह’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लखनऊमधील पीजीओ रुग्णालयात कोरोना वार्डमध्ये भरती असणारी सिंगर कनिका कपूर हिचा कॉविड 19 टेस्ट रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. पुष्टी करण्यासाठी डॉक्टर तिची पुन्हा एकदा तपासणी करणार आहेत. कनिकाची प्रकृती सतत सुधारताना दिसत आहे. कनिकाला आता ताप, सर्दी किंवा खोकला असा कोणताही त्रास नाही.

View this post on Instagram

Thank you @judithleiberny Love my #Camera #bag 👜

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor) on

शुक्रवार दि 3 एप्रिल 2020 रोजी कनिकाचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. शनिवारी (दि 4 एप्रिल) तिचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. डॉक्टरांच्या पुष्टीसाठी नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. कनिकाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आता ती वार्डमधील डॉक्टर आणि स्टाफमधील नर्सला गाणं ऐकवत आहे. बॉलिवूडमधील किस्से सांगत आहे.

कोरोनाची लागण झालेल्या कनिका कपूरच्या याआधी पाच कोरोना व्हायरस टेस्ट करण्यात आल्या होत्या. ज्यात ती पॉझिटीव आढळली होती. तरीही तिच्याबद्दल एक दिलासा देणारा बाब समोर आली होती. पीजीओ हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं होतं. कनिकामध्ये या आजाराची कोणतीही लक्षणं नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. यानंतर आता कनिकाचे रिपोर्टही निगेटीव्ह आले आहेत.

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like