Coronavirus : दिल्लीत 24 तासात आढळले 591 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या 13000 च्या टप्प्यात

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी कोरोना संक्रमितांची ५९१ नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर संक्रमितांची संख्या वाढून १३ हजारवर गेली आहे.

दिल्ली आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार, राजधानीत कोरोनाची एकूण १२,९१० प्रकरणे नोंदली गेली आहेत. कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत २३१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ६२६७ रुग्ण या आजाराने बरे होऊन त्यांच्या घरी गेले आहेत. दिल्लीत सध्या ६४१२ ऍक्टिव्ह रूग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिल्लीत शनिवारी सलग पाचव्या दिवशी एका दिवसात ५०० किंवा त्याहून अधिक नवीन प्रकरणे नोंदली गेली. शुक्रवारी ६६० नवीन प्रकरणे समोर आली होती, जी आतापर्यंत एका दिवसातील सर्वात जास्त प्रकरणे आहेत.

शनिवारी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये दिल्लीच्या आरोग्य विभागाने म्हटले की, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २३१ झाली आहे आणि एकूण प्रकरणे वाढून १२,९१० वर गेली आहेत. शुक्रवारपर्यंत संक्रमितांची संख्या १२,३१९ होती आणि २०८ लोकांचा मृत्यू झाला होता.

कार या महामारीला रोखण्यासाठी अधिकाधिक चाचण्या करण्यावर जोर देत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, दिल्लीत दर १० लाख लोकांमध्ये ८१७३ लोकांची चाचणी केली जात आहे.

तसेच सरकारने या महामारीला टाळण्यासाठी लोकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क घालणे व विनाकारण घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.