‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर 31 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर प्रतिबंध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जागतिक साथीच्या कोरोना विषाणूमुळे केंद्र सरकारने देशातील आंतरराष्ट्रीय उड्डणांवरली बंदी वाढवली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणावरील बंदी ही आता 31 जुलै 2020 पर्यत वाढवण्यात आली आहे. तत्पूर्वी या आदेशात म्हटले होते की, 15 जुलैपर्यंत भारतात आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिली जाणार नाही. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे भारतातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे 31 मार्पासून बंद करण्यात आली आहेत.

देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय विमानसेवा मागील काही महिन्यांपासून बंद आहे. कोरोनाचा विषाणूचा संसर्गामुळे भारतातून परदेशात होणारी विमान सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं सुरु करण्यासंदर्भात भारताकडून बोलणी सुरु झाली आहेत. अमेरिका, कॅनडा आणि मध्यपूर्वेकडील विमान सेवा सुरु करण्यासंदर्भात चर्चा पुढील टप्प्यात पोहोचली आहे, अशी माहिती भारताच्या एअरपोर्ट अथॉरिटीचे अध्यक्ष अरविंद सिंग यांनी दिली.

भारतातील परदेशातील विमानसेवा बंद करून 1 जुलै रोजी 100 दिवस झाले. आता आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याविषयची चर्चा अखेरच्या टप्प्यात आली आहे. पण भारतातही प्रत्येक राज्यात सध्या क्वारंटाईन आणि इतर नियम वेगवेगळे असल्याने बाहेरचे देश आणि देशांतर्गत राज्य या दोन्ही बाजूंनी चर्चा हेणे अपेक्षित आहे. अरविंद सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरीका, कॅनडा आणि यूएई यांच्याशी चर्चा पुढच्या टप्प्यात पोहचली आहे.