आता पाकिस्तानची ‘झोप’ उडणार, भारतीय सेनेची ‘इंटिग्रेटेड बॅटल’ तुकडी सीमेवर तैनात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये भारताने कलम 370 रद्द केल्यानंतर चवताळलेला पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याची तसेच भारताला धमकावण्याची भाषा करत आहे. यासाठी भारतीय लष्कराने देखील मोठी तयारी केली असून सीमेवर इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप म्हणजेच IBG तैनात करणार आहे. 3,323 किलोमीटर लांब सीमेवर भारत या वर्षाअखेरपर्यंत हि पहिली तुकडी तैनात करणार आहे. यासाठी भारतीय सैन्याने 11 ते 13 इंटिग्रेटेड सैन्याच्या तुकड्या बनवण्याची योजना आखली असून सैन्यप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी हि माहिती दिली आहे.

सरंक्षण मंत्रालयाने देखील IX कॉर्प्स ला मंजुरी दिली असून यामार्फत हे इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप तयार केले जाणार आहेत. त्यानंतर त्यांना पश्चिम सीमेवर तैनात करण्यात येणार आहे. 2009 मध्ये सर्वात आधी IX कॉर्प्स हि युवा तुकडी तयार करण्यात आली होती. जी सध्या चंडीमंदिर, हरियाणा स्थित लष्कराचा भाग आहे. पाकिस्तानी लष्कराकडून येत असलेल्या पोकळ धमक्यांमुळे हि तुकडी तयार करण्यात आली असून सैन्यप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी यासाठी प्रस्ताव दिला होता.

IBG म्हणजेच इंटिग्रेटेड बॅटल ग्रुपद्वारे सर्व युद्ध सामग्री एकाच ठिकाणी गोळा करण्याचे भारतीय सेनेचे लक्ष आहे. याची कार्यपद्धती थोडी नवीन असणार आहे. या प्रत्येक इंटिग्रेटेड बॅटल ग्रुपमध्ये कमीत कमी सेनेच्या तीन ब्रिगेडचा समावेश असणार आहे. त्यांच्याकडे सर्व प्रकारची युद्धसामग्री असणार आहे. तोफा, विमाने, त्याचप्रमाणे जलमार्गे हल्ला करण्याची देखील त्यांची तयारी असणार आहे.

दरम्यान, या प्रत्येक इंटिग्रेटेड बॅटल ग्रुपमध्ये 20,000- 25,000 जवानांचा समावेश असणार आहे. हा गट आपले स्वतंत्र काम करणार आहे. तसेच ते इतरांची मदत देखील घेऊ शकणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त