‘कोरोना’ व्हायरस संक्रमित असताना देखील झाले बरे, पण समजलं नाही : ICMR च्या स्टडीमध्ये खुलासा

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात तीन जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आणि तिघेही स्वस्थ झाले. विशेष म्हणजे त्यांना विषाणूची लागण झाल्यापासून ते कोविड -19 निगेटिव्ह होईपर्यंत काहीच माहित नव्हते. आयसीएमआरच्या सेरो प्रिव्हलेन्स अभ्यासामध्ये हे उघड झाले आहे. आयसीएमआरने आपल्या अहवालात असेही म्हटले आहे की जिल्ह्यात कम्यूनिटी स्प्रेडची कोणतीही चिन्हे आढळली नाहीत.

सीएमओ डॉ. व्हीके शुक्ला म्हणाले की, 17 आणि 18 मे रोजी आयसीएमआरची टीम सेरो प्रिव्हलेन्स अभ्यासासाठी जिल्ह्यात आली. या पथकाने 10 भागात दोन दिवस रक्ताचे नमुने घेतले. या अभ्यासात एकूण 408 लोकांचे नमुने घेण्यात आले. यात फतेहगंज पूर्व, शिशगढ, शहरातील प्रभाग क्रमांक 18 आणि 52, रिछोला चौधरी, अब्दानपुर आणि इतर ठिकाणांचा समावेश होता. आयसीएमआरने आपल्या सर्व्हेचा अहवाल पाठविला आहे. यातून स्पष्ट झाले की जिल्ह्यात कम्यूनिटी स्प्रेड नाही. यापूर्वी केवळ 3 लोकांना कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बाधा झाली आहे. या अहवालानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

बरेली मधील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 123

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शनिवारी (13 जून) कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा समोर येण्याचा क्रम कायम राहिला. शनिवारी आयव्हीआरआयकडून 110 नमुन्यांचा अहवाल आला ज्यात 11 पॉझिटिव्ह होते. यामध्ये दोन पॉझिटिव्ह नमुने फरीदपूरच्या जोडप्याचे होते ज्यांचा कोविड-19 रुग्णालयात उपचार सुरु आहे. इतर 9 नमुने नवीन रूग्णांचे आहेत. जिल्ह्यात कोरोना-संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 123 झाली आहे.

जिल्हा सर्व्हिलन्स अधिकारी डॉ. रंजन गौतम यांनी सांगितले की शनिवारी आयव्हीआरआयने एकूण 110 नमुन्यांचा अहवाल दिला असून त्यामध्ये 11 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आली आहेत. यामध्ये फरीदपूर येथील जोडप्याचा नमुनाही पॉझिटिव्ह आला आहे, त्यांच्यावर कोविड-19 रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहा दिवसानंतर त्यांचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला जो पॉझिटिव्ह आला आहे. याव्यतिरिक्त 9 नवीन संक्रमण आढळले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे शाहदाना, जुन्या शहरातील कांझीटोला, बिहारीपूर, छोटी बमनपुरी येथील रहिवासी आहेत. या सर्वांना कोविड-19 रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात येत आहे.