मुंबईतून बिहारला परत निघाल्यानंतर SP विनय तिवारींनी व्यक्त केली भावना, म्हणाले – ‘मला नव्हे, सुशांत प्रकरणाच्या तपासाला क्वारंटाईन केलं होतं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांच्या टीमचे नेतृत्व करण्यासाठी पोहचलेले पाटणा एसपी विनय तिवारी यांना बीएमसीने क्वारंटाइन केल होते. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. आता बीएमसीने विनय तिवारी यांना क्वारंटाइनमधून सोडले आहे. ते शुक्रवारी मुंबईहून पाटणासाठी रवाना झाले.

मुंबईतून निघताना पत्रकारांशी बोलताना तिवारी म्हणाले, त्यांनी मला नव्हे, सुशांत प्रकरणाच्या तपासाला क्वारंटाइन केले होते. आयपीएस अधिकारी विनय तिवारी म्हणाले, मला क्वारंटाइन करून बिहार पोलिसांच्या तपासाला रोखण्यात आले होते.

जबरदस्तीने क्वारंटाइन केल्याने खळबळ

आयपीएस विनय तिवारी यांना क्वारंटाइन केल्याने राज्यातच नव्हे तर देशभरात एकच चर्चा सुरू झाली होती. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांच्यापासून मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि बिहारच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

प्रकरणात सुप्रीम कोर्टाने टिपण्णी करताना म्हटले होते की, अभिनेत्याच्या मृत्यूच्या प्रकरणात सत्य समोर आले पाहिजे. मुंबई पोलिसांच्या कामाची प्रतिष्ठा चांगली आहे, परंतु बिहार पोलीसांच्या अधिकार्‍याला क्वारंटाइन करण्याने चांगला संदेश गेलेला नाही.

बिहार पोलिसांनी दिला कायदेशिर कारवाईचा इशारा

तर बिहारच्या डीजीपींनी सुशांत प्रकरणाच्या तपासाठी मुंबईत गेलेले आयपीएस विनय तिवारी यांना परतण्यास परवानगी न दिल्याने कायदेशिर कारवाईचा इशारा दिला होता. डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांनी म्हटले होते की, पाटणा एसपी विनय तिवारी यांना जबरदस्ती क्वारंटाइनमध्ये ठेवल्याने सरकारला पूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. जर त्यांना सोडण्यात आले नाही तर महाधिवक्ता यांचा सल्ला घेऊन ठरवले जाईल की काय करायचे. न्यायालयात जाण्याचा सुद्धा पर्याय आहे.

त्यांनी म्हटले की, विनय तिवारी मुंबई पोलीसांना कळवून मग गेले होते. पत्र लिहून तीन दिवस राहण्यासाठी आयपीएस मेसमध्ये व्यवस्था करण्याची विनंती केला होती. आयपीएस मेसमध्ये थांबण्याची व्यवस्था न झाल्याने ते ज्याठिकाणी थांबले होते, तेथे अर्ध्या रात्री पोहचून बीएमसीने कोणतीही तपासणी न करता त्यांना क्वारंटाइन केले. बीएमसी अधिकारी विनय यांन सोडण्यास तयार नव्हते.

बीएमसीने दाखवला हेकेखोरपणा

यापूर्वी आयपीएस अधिकार्‍याला जबरदस्तीने क्वारंटाइन करण्याच्या मुद्दयावर बीएमसी अधिकार्‍यांनी म्हटले होते की, सेंट्रल पाटणा एसपी विनय तिवारी यांना क्वारंटाइनमधून सूट पाहिजे असेल तर त्यांनी अटी मनण्यासह अर्ज करावा लागेल, तेव्हाच त्यांना मुंबईतून जाण्यास परवानगी दिली जाऊ शकते. जर त्यांनी असे केले नाही तर 15 ऑगस्टपर्यंत त्यांना होम क्वारंटाइन राहावे लागेल.