काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश ; इस्लामिक स्टेटच्या कमांडरचा खात्मा 

श्रीनगर : वृत्तसंस्था – इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मिरचा कमांडर इशफाक अहमद सोफीचा खात्मा करण्यात  सुरक्षा दलांना यश मिळले आहे. सोफी इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू ऍण्ड काश्मीरच्या (आयएसजेके) प्रमुख कमांडरपैकी एक होता. मात्र झाकीर मुसाला पकडण्यात अद्याप सुरक्षा दलांना यश मिळालेले नाही. मुसा पंजाबमध्ये लपून बसल्याचे वृत्त गेल्या आठवड्यात आले होते.
याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, इशफाक अहमद सोफी हा दहशतवाद्यांमध्ये अब्दुल्ला भाई नावाने ओळखला जायचा. आज पहाटे सोपोरच्या अमशीपोरात सुरक्षा दलांची चकमक झाली. त्यात सोफीला कंठस्नान घालण्यात आलं त्याच्याकडून शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. सोफीचा खात्मा केल्यानंतर मात्र सोपोरच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी परिसरातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
कोण होता सोफी ? 
सोफी आयएसजेकेचा कमांडर होता. त्याच्याकडे काश्मीरमधल्या कारवायांची जबाबदारी होती. २०१५ मध्ये तो हरकत-उल-मुजाहिदीन संघटनेसोबत काम करत होता. त्यानंतर तो २०१६ मध्ये त्यानं आयएसजेकेमध्ये सामील झाला. याआधी सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत बुरहान वाणी गँगचा शेवटचा कमांडर लतिफ टायगर मारला गेला.

काही दिवसापूर्वी सुरक्षा दलाने शिपोया जिल्ह्यात चकमकीत तीन अतिरेक्यांना ठार केले होते. त्यात हिजबुल कमांडर लतीफ टायगरचा समावेश होता. टायगर हा बुरहान वानी याचा जवळचा साथीदार समजला जात होता.