KBC 11 : ‘या’ प्रश्‍नामुळं 7 कोटी जिंकू शकला नाही सनोज राज, 1 कोटी जिंकून बनला ‘करोडपती’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिहारच्या सनोज राजने कौन बनेगा करोडपतीच्या  11 व्या  सीझनमध्ये इतिहास रचला आहे.  सनोज राज  ह्या  सीझनचा पहिला करोडपती ठरला आहे.  शुक्रवारी सनोजने 15 योग्य प्रश्नांची उत्तरे देऊन 1 कोटी रुपये जिंकले आहेत.

सरळसाध्या आणि मृदुभाषी सनोजने अत्यंत धिराने आणि निर्धाराने एकामागून एक प्रश्नांची उत्तरे देत लढा जिंकला. जेव्हा सनोजला 1 कोटीचा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याने उत्तर माहित असूनही त्यांनी लाईफलाईनचा वापर केला. उत्तर माहित असूनही लाईफलाईन का वापरली हे बिग बीने विचारले असता, सनोजने सांगितले की कारण 7 कोटी प्रश्नामध्ये आपण कोणतीही लाईफलाईन वापरु शकत नाही, म्हणूनच त्यांनी उत्तर  देण्यास 1 कोटीच्या प्रश्नासाठी लाईफलाईन वापरली. 1 कोटी जिंकल्यानंतर सनोज पुन्हा 7 कोटींच्या प्रश्नावर आला, परंतु सनोजला हा प्रश्न माहित नव्हता आणि त्याने गेम सोडला.

16 वा प्रश्न क्रिकेटशी निगडीत होता की ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमनने कोणत्या भारतीय गोलंदाजाच्या चेंडूवर धावा फटकावून पहिले शतक ठोकले होते ? आणि या प्रश्नाचे चार पर्याय होते –

बाका जिलानी
सी रंगाचारी
गोगुमल किशन चंद
कंवर रायसिंग

सनोजला या प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते, म्हणून त्याने जोखीम पत्करता खेळ  सोडला . या प्रश्नाचे योग्य उत्तर होते गोगुमल किशनचंद.

कोण आहे सनोज राज –

सरोज बिहारच्या जहानाबादचा आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेला सनोज तंत्रज्ञान विषयात पदवीधर आहे.आयएएस होण्याचे त्याचे स्वप्न आहे.

आरोग्यविषयक वृत्त –