मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – ऑनलाईन शॉपिंग आणि कोणत्याही कस्टमर केअरच्या योग्य क्रमांकाबद्दल नेहमीच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, तसेच आपल्या खात्याशी संबंधित माहिती कुठेही शेअर करू नये, अन्यथा तुमचेही खाते साफ होईल, जसे त्यांच्या बाबतीत घडले आहे. एका ४० वर्षीय व्यावसायिकाने काही खाद्यपदार्थांची ऑनलाइन ऑर्डर दिली. त्यांनी ४०० रुपयांचे दोन भुजिया पॅकेट्स देखील मागवले होते, परंतु ते त्यांना मिळाले नाही. याविषयी चौकशी करण्यासाठी त्यांनी इंटरनेटवर सर्च करून ग्राहक सेवा क्रमांक घेतला आणि त्यानंतर त्यांना २.२५ लाख रुपयांचा चुना लागला. पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
ही घटना मुंबईच्या बोरिवलीची असून २२ एप्रिल रोजी व्यावसायिकाने ऑनलाइन किराणा दुकानातून काही वस्तूंची ऑर्डर केली. त्यांना सर्व सामान मिळाले, परंतु भुजियाचे दोन पॅकेट्स मिळाले नाहीत. त्याची किंमत ४०० रुपये होती. १ मे रोजी त्यांनी गुगलवर किराणा वेबसाइटचा नंबर शोधला. परंतु त्यांना इथे एक बनावट हेल्पलाइन नंबर मिळाला, जो सायबर चोरट्यांनी त्या वेबसाइटचा ग्राहक सेवा क्रमांक म्हणून अपलोड केला होता. त्या चोरट्यांनी त्यांना खाते क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि एटीएम कार्डचा सीव्हीव्ही क्रमांक विचारला.
त्यानंतर चोरांनी त्यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवली आणि ते दुसर्या नंबरवर ती फॉरवर्ड करण्यास सांगितली. यानंतर त्यांना मोबाईलवर आलेला यूपीआय पिन आणि ओटीपी विचारला आणि व्यावसायिकाने तो सांगितला देखील. दोनच तासांत चार वेळा करून त्यांच्या खात्यातून २.२५ लाख रुपये काढले गेले. तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले.
सायबर क्राईमचा तपास करणारे रितेश भाटिया यांनी सांगितले की, ठगांनी पीडिताला बँक खाते क्रमांक, सीव्हीव्ही, यूपीआय पिन आणि ओटीपी देण्यास मान्य केले. त्याने यशस्वीरित्या आपल्या मोबाइलवर यूपीआय खाते सेट केले आणि त्यांच्याकडे कार्डाचे तपशीलदेखील होते, त्यामुळे त्याने सहजपणे पैसे काढले. लोक अजूनही ओटीपी व सीव्हीव्ही क्रमांक सांगतात याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
सायबर पोलिसांचे डीआयजी हरीश बैजल म्हणाले की, “अशा घटना वाढल्या आहेत आणि लॉकडाऊनमध्ये लोकांची फसवणूक करण्यासाठी ठग नवीन पद्धत वापरत आहेत. लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आम्ही लोकांसाठी एडव्हायजरी जारी करत असतो आणि ट्विटर हँडलद्वारे लोकांना जागरूक करतो.”