आता PF दावे फक्त 3 दिवसांतच निकाली, KYC धारकांसाठी खूप सोपे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) जास्तीत जास्त तीन दिवसात भागधारकांचे सर्व दावे निकाली काढण्याची तयारी करत आहे. केवायसी आणि यूएएन-आधार जोडल्यास दावे निकाली काढण्यास उशीर होणार नाही, असे ईपीएफओचे आयुक्त सुनील बर्थवाल यांनी सोमवारी सीआयआयच्या कार्यक्रमात सांगितले.

सीआयआय कार्यक्रमात बोलताना सुनील बर्थवाल म्हणाले की, ‘डेटा हाताळणीमुळे काही टक्के कर्मचारी यूएएन (12-अंकी क्रमांक) तयार करण्यास सक्षम नाहीत. हे लक्षात घेता, ईपीएफओ कर्मचारी डेटाबेसद्वारे पडताळणीच्या वैकल्पिक प्रणालीचा विचार करीत आहे. ईपीएफओ ई-तपासणी प्रणाली देखील सुरु करणार आहे. त्याचा हेतू तपासणीची प्रक्रिया सुलभ करणे आणि योग्य त्याशिवाय समोरासमोर चौकशी करण्याची प्रक्रिया कमी करणे हा आहे.’

शोषण रोखण्यासाठी ईपीएफओने या कायद्यात दुरुस्ती प्रस्तावित केली आहे. त्याअंतर्गत तपासणीचा जास्तीत जास्त कालावधी दोन वर्षे असेल. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या धर्तीवर सल्लागार संस्था तयार करण्याचा प्रस्तावही आहे. हे भ्रष्टाचार रोखण्यास मदत करेल. तसेच डिफॉल्टर्सना गुन्हेगारी प्रवर्गातून वगळण्याचा आणि या खटल्यांचे आर्थिक गुन्हे म्हणून वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. अशीही माहिती बर्थवाल यांनी दिली.

सुविधा

केवायसीधारकांसाठी ही सुविधा मिळवणे खूप सोपे असेल.
यूएएन नंबर न मिळाल्याने अडचणीत आलेल्या भागधारकांची समस्या लवकरच सुटेल.

आरोग्यविषयक वृत्त –